Breaking
अलिबागकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

शिरवली नवीन वसाहतीत शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 0 8 9 0

शिरवली नवीन वसाहतीत शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: छत्रपती शिवाजी महाराजांची गौरवशाली पराक्रमगाथा नवीन पिढीपर्यंत पोहचविण्याच्या हेतूने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत सातविरादेवी मित्रमंडळ, नवीन वसाहत शिरवली यांच्यातर्फे दिनांक १७ मार्च २०२५ रोजी शिवजयंती सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत समाजसेवेचा वारसा जपणाऱ्या सातविरादेवी मित्रमंडळ शिरवली यांच्यातर्फे साजऱ्या केल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे हे आठवे वर्ष होते. यानिमित्ताने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.
शिवज्योत आगमन, मिरवणूक, शिवपूजन, शिववंदन व आरती, हळदीकुंकू समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजक खेळ, स्नेहभोजन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन व कार्य यावरील पोवाडा व भाषणे सादर करण्यात आली. मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शिरवली ग्रामस्थ, महिला यांनी हा सोहळा यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी परीश्रम केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे