जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी बनला वर्ग २ अधिकारी
जिल्हा प्रतिनिधी परभणी

जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी बनला वर्ग २ अधिकारी
प्रतिक दत्ताजी भोसले सहाय्यक नगर रचनाकार अधिकारी वर्ग 2
जिल्हा प्रतिनिधी परभणी
परभणी: नुकत्याच झालेल्या एम.पी.एस.सीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन आ.प्रतीक दत्ताजी भोसले
हे परभणी येथे रुजू झाले आहेत.
प्रतीक ने माहूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक पूर्ण करून माध्यमिक शिक्षण हे नांदेड येथे कुठलाही क्लास न लावता पूर्ण केले व उच्च शिक्षण सी.ई.ओ.पी कॉलेज पुणे येथे पूर्ण केले.
बाल वयात स्पर्धा परीक्षेची आवड असल्यामुळे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच एम.पी.एस.सी.चे क्लास करत असलेला प्रतिक पहिल्या प्रयत्नात वयाच्या 22 व्या वर्षी एम.पी.एस.सी .क्रॅक करून प्रशासनामध्ये सेवेची संधी अधिकारी वर्ग. 2.या पदावर मिळवली.
अत्यंत जिद्दी मेहनती आणि कष्टाळू असलेला प्रत्येक त्याला तसेच वडील दत्ताजी भोसले व आई मायावती भोसले यांचे संस्कार लाभले. व बाल वयातच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण केली. हा त्यांचा आदर्श समाजापुढे प्रेरणा देत राहील .समाजसेवेच बाळकडू आई वडिलांकडून मिळाले. प्रतीक ला पुढे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च पद मिळविण्याची जिद्द आहे. त्याला खूप खूप शुभेच्छा.या यशाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन.कौतुक होत आहे .पुढील वाटचालीसाठी प्रतिकला खूप खूप शुभेच्छा.