‘कवितेवर बोलू काही’ कवी संमेलन व कैफियत काव्यहंग्रहाचे प्रकाशन उद्या
संमेलनाध्यक्ष प्रा.ज्ञानेश वाकुडकर, तर उद्घाटक मार्गदर्शक म्हणून डॉ अनिल पावशेकर, बळवंत भोयर
‘कवितेवर बोलू काही’ कवी संमेलन व कैफियत काव्यहंग्रहाचे प्रकाशन उद्या
संमेलनाध्यक्ष प्रा.ज्ञानेश वाकुडकर, तर उद्घाटक मार्गदर्शक म्हणून डॉ अनिल पावशेकर, बळवंत भोयर
पुस्तक प्रकाशनास प्रबोध धोंगडे, डॉ यमुना नाखले व दिवाकर गणवीर राहणार उपस्थित
नागपूर कवी कवयित्रींची रंगणार काव्यमैफील
बिनधास्त न्यूज, जिल्हा प्रतिनिधी नागपूर
नागपूर: (दि.१ मार्च): मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था मागील ८ वर्षापासून मराठी भाषा सक्षमीकरणासाठी कार्य करीत आहे. दरसाल प्रमाणे यंदाही मराठीचे शिलेदार प्रकाशनाचा मोठा कार्यक्रम एप्रिल महिन्यात घेण्याचा मानस आहे. परंतु नागपूर शहरातील मराठी सारस्वतांचेही मराठी साहित्य क्षेत्रात असलेले योगदान पाहता ‘कवितेवर बोलू काही’ या साहित्य संवाद कार्यक्रमाचे आयोजन दि २ मार्च २०२५ रोजी स. ११.३० ते २.३० पर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह ऊरूवेला कॉलनी येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास संमेलनाध्यक्ष सखे साजणीकार प्रा.ज्ञानेश वाकुडकर, तर उद्घाटक मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध स्तंभलेखक डॉ अनिल पावशेकर, प्रसिद्ध कवी बळवंत भोयर, प्रमुख पाहुणे म्हणून नितेश मेश्राम अध्यक्ष निरवाना बहुउद्देशीय संस्था, डॉ यमुना नाखले, प्रबोध धोंगडे, दिवाकर गणवीर, संस्थेच्या सचिव पल्लवी पाटील, मुख्य आयोजक सविता धमगाये हे साहित्यिक मान्यवर उपस्थित राहणार आहे.
शहरातील प्रसिद्ध कवयित्री व चित्रपट निर्माती प्राजक्ता खांडेकर यांच्या ‘कैफियत’ या कविता संग्रहाचे प्रकाशन याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच ज्या कवी,कवयित्री, लेखकांची पुस्तके प्रकाशित झालेली आहे अशांना त्यांच्या पुस्तकावर बोलण्याची संधी देण्यात येत असून यामध्ये संजयवाणीकार डॉ संजय पाचभाई, कवयित्री माधुरी काळे, वणी, प्राजक्ता खांडेकर व सविता धमगाये साहित्य संवाद सत्रात पुस्तकाविषयी मनोगत मांडणार आहेत.
‘कवितेवर बोलू काही’ या कार्यक्रमाच्या शीर्षकांतर्गत होऊ घातलेल्या काव्य मैफिलीत विदर्भातील कवी कवयित्री मोठ्या संख्येनी सहभागी होणार असून आपल्या बहारदार रचना या कवी संमेलनात सादर करणार आहे. या संमेलनास शहरातील मराठी भाषा प्रेमी, काव्यरसिक, मराठी वाचक वर्घांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समिती व संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील, सविता पाटील ठाकरे, सविता धमगाये व रजत डेकाटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9834739798 वर संपर्क करावा असे संस्थेच्या सचिव पल्लवी पाटील यांनी सांगितले आहे.





