
0
4
0
9
0
3
नजाकत
तव नजाकत साजणी
पाहून उडे मम दैना
तुझ्या रुपाला पाहता
कसा लाजतो बघ ऐना
अलवार तुझी चाहूल
का मना घालिते भूल
जसे डहाळीवरचे फूल
मनी गंधाचे दरवळ
स्वप्नची तू विधात्याचे
सत्यात आकारा आले
तव गालावरचे गोंदण
मन माझे तिथेच रमले
ते शब्द तव मुखीचे
जणू मधाची पोळी
तव गात्रातून वाहते
यौवनाची नशा आगळी
होशील माझी राणी
तो सुदिनची असेल
मग स्वर्गची अवघा
धरेवरी अवतरेल
वृंदा(चित्रा)करमरकर
जिल्हा सांगली
==========
0
4
0
9
0
3





