Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरब्रेकिंगविदर्भ

नागपुरात मध्यरात्रीनंतर पावसाची दमदार हजेरी

नरेंद्रनगर पुलाखाली गुडघाभर पाणी

0 4 8 2 8 2

नागपुरात मध्यरात्रीनंतर पावसाची दमदार हजेरी

नरेंद्रनगर पुलाखाली गुडघाभर पाणी

वादळी वा-यासह, वीजेचा लपंडाव सुरू

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर: (दि २३) नागपूर शहरात सर्वदूर मध्यरात्रीनंतर वीज गायब होऊन पहाटे २.०० च्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाच्या सरी बरसल्याने नागरिकांची झोप उडाली.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार सोसाट्याच्या वा-यासह पावसाने हजेरी लावली. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आज शहरी भागात सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन होणार नसल्याचे चित्र आहे.

नरेंद्रनगर पुलाखाली गुडघाभर पाणी:

शहरातील छत्रपती चौक ते दिघोरीकडे जाणा-या नरेंद्रनगर रेल्वेपुलाखाली गुडघाभर पाणी साचले असेन शेजारील झाडही पडल्याचे दिसून आले. या गुडघाभर साचलेल्या पाण्यातून दुचाकीस्वार मार्ग काढतांना दिसून आले.

मानेवाडा चौकात पाणीच पाणी

दक्षिण नागपुरातील मानेवाडा चौकात इंडीयन आईल पेट्रोल पंप लगतच्या ५०० मीटर परिसर जलमय झाला असून, उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने खोलगट भागात पाणीच पाणी साचल्याने पादचारी व वाहनचालकांना या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

दिघोरीतही सोसाट्याच्या वारा:

शहरात पावसाने लावलेल्या हजेरीने शहरातील दिघोरी, रामकृष्णनगर परिसरातील पहाटेपासून वीज गायब झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. राम कृष्ण नगर, दिघोरी नाका येथे वीजेचा लपंडाव सुरू असून, सोसाट्याचा वारा आल्याने जीवित हानी होऊ नये म्हणून वीज बंद केली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे