
0
5
4
7
2
9
नारीशक्तीचा विजय
अलंकार शौर्याचा लेवून
उतरली नारी रणांगणात
दुर्गा,भवानी, महाकाली
दिसली रूपे अनेक तिच्यात
अन्यायाशी लढताना नारी
सूर्याप्रमाणे ती चमकली
पंख घेऊन गरुडाचे तिने
अवकाशात झेप घेतली
तिच्या गौरवाची गाथा
साऱ्या जगाला कळली
प्रेम,माया ममता,करूणेची
मुरत संसारातही रमली
शिक्षणानेच परीवर्तन झाले
जग नारीशक्तीपुढे झुकले
सोनेरी सुखाचे आनंदाचे दिवस
तिच्या आयुष्यात आता आले
तिचा त्याग तिचा पराक्रम
बघून दिपले डोळे जगाचे
नारीशक्तीचा विजय झाला
सरले दिवस तिच्या गुलामीचे
प्रतिमा नंदेश्वर
ता.मूल, जि.चंद्रपूर
0
5
4
7
2
9



