
0
6
8
5
2
7
पुनरावृत्ती
नकळत घडला असेल
तर एखादा गुन्हा माफ
पुनरावृत्ती होत असेल
कायमचा सुफडा साफ.. //
पश्चातापाचे प्रायश्चित्त
अंतःकरणपूर्वक घ्यावे
कठोर आत्मक्लेशातून
आत्मशुद्धीकडे जावे..//
प्रबळ इच्छाशक्तीनेच
वाल्याचा वाल्मिक होई
चुकांच्या पुनरावृत्तीने
घोर अधःपतनास जाई.. //
म्हातारी मेली मरू देत
मात्र काळ सोकावू नये
पुन्हा पुन्हा माफी देवून
इथे गुन्हेगार निर्ढावू नये.. //
शासन असे असावे की
ठरून जावा वस्तूपाठ
पुनरावृत्तीचा परिणाम
साक्षात मृत्यूशीच गाठ.. //
विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
0
6
8
5
2
7



