Breaking
कवितानागपूरमराठवाडासाहित्यगंध

खंतवाणी; विष्णू संकपाळ

छ.संभाजीनगर

0 4 8 2 9 3

खंतवाणी

किंचित विपरीत घडताच,आळवू नये खंतवाणी
यथावकाश होतेच, दूध का दूध पाणी का पाणी..//

हीच तर असते तुमच्यातल्या, संयमाची परीक्षा
मनासारखे घडण्यासाठी, करावी थोडी प्रतिक्षा..//

बावन्नकशी सोनेच येथे, अग्निदिव्य करते पार
इवलीशी मुंगी सुद्धा, मानत नाही कधीच हार.. //

चाळून पाहा संतचरित्रे, कळे यातनामय प्रवास
असंभवही संभव होते, करीता अखंड सायास.. //

उभा राहोत मार्गात जरी, लाख संकटांचे पहाड
उरात हिम्मत अन् मुखात, सिंहगर्जनेची दहाड.. //

शिकून घ्यावे चुकातूनही, नको मनात खंत खेद
शून्यातून नव निर्मितीची, जागायला हवी उम्मेद..//

हर पहाट देते संधी नवी, जागा हो रे ध्येयवेड्या
गळून पडू देत मनातल्या, खंतवाणीच्या बेड्या.. //

विष्णू संकपाळ,बजाजनगर
छ. संभाजीनगर
============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे