0
4
8
2
9
0
असे कसे बोलायचे
मनात असते खूप काही
जहाल लांडगे माजलेले
उलथून टाकावी सत्ता सारी
आणि वाजावा बिगूल समतेचा
जिकडे तिकडे बेबंदशाही
प्रजा सारी भरकटलेली
हाकलून नेती पाहीजे तिथे
थोड्याच लालचेने पोसलेली
लांडगे फिरती उजळ माथी
विचारक सारे गजाआड होती
गुंडानाही मिळतो मानसन्मान
सात्विकतेचा निरंतर अपमान
घशापर्यंत पाणी आले
थांबा अजून वेळ आहे
असे कसे बोलायचे हो
चोर तो चोर शिरजोर आहे
अजूनही विखूरलेलेच
सांगत फिरत संविधान आहेत
अरे बाबा तुमच्यात दम किती
बोटे मोडलेली आहेत
तरीही म्हणता आम्ही एक
आम्ही नेक
सांगा यापेक्षा गमंत मोठी काय
सविता धमगाये/पाटील
जिल्हा नागपूर
0
4
8
2
9
0



