Breaking
चारोळीनागपूरसाहित्यगंध

बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 6 0 5 6 6

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सात🌈🌈🌈*

*🥀विषय : गावाकडची श्रीमंती🥀*
*🍂बुधवार : ०२ / सप्टेंबर /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*गावाकडची श्रीमंती*

मातीचा सुगंध,शेतात हिरवी नाती,
साधेपणात दडलेली खरी श्रीमंती…
माणुसकीची ऊब अन् प्रेमाची साथ,
यालाच म्हणतात गावाकडची श्रीमंती…

*श्रीमती सीमादेवी बेडसे चाळीसगाव*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह…*
♾️♾️♾️♾️〽️🌈〽️♾️♾️♾️♾️
*गावाकडची श्रीमंती*

मातीच्या कुशीत संस्कार फुलती,
कष्टांच्या घामात स्वप्ने खुलती;
पैशांनी नाही, मनांनी माणसं श्रीमंत होती,
म्हणूनच जगणे शिकवते गावाकडची श्रीमंती!

*मनोज परसराम शिंदे*
*ता पालम जिल्हा परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️🌈〽️♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*गावाकडची श्रीमंती*

आई निरंतर म्हणतसे
चला करायची भ्रमंती,
पाहूया नजरेने आपण
ही गावाकडची श्रीमंती.

*रविंद्र भिमराव पाटील*
शारदानगर,चोपडा,जि.जळगाव
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️🌈〽️♾️♾️♾️♾️
*गावाकडची श्रीमंती*

नसे जरी बडेजाव आमचा
परी माणुसकीचा झरा वसे
साध्या सरळ जीवनात या
गावाकडची श्रीमंती दिसे

*सौ अर्चना जगदिश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️🌈〽️♾️♾️♾️♾️
*गावाकडची श्रीमंती*

गावाकडची श्रीमंती
मोकळा ढाकळा निसर्ग
हवाहवा असतो संगतीत
वाटतो नेहमीच तो स्वर्ग ॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️🌈〽️♾️♾️♾️♾️
*गावाकडची श्रीमंती*

गावाकडची श्रीमंती
आहे सर्वांना पसंती
शुद्ध पर्यावरण शुद्ध हवा
निरोगी आरोग्य हीच धनसंपती

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️🌈〽️♾️♾️♾️♾️
*गावाकडची श्रीमंती*

हिरवगार शेत नटलं धान्यभाज्यांनी
बळीचा खुशीने वानवळा पाहुण्याला
गावाकडची श्रीमंती मौल्यवान सोन्याहूनी
मन सुखावते जीव लावते माणसाला

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️🌈〽️♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 6 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे