Breaking
आरोग्य व शिक्षणकविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

राज्यातील 40 साहित्यिकांना ‘वर्ल्ड बुक ॲवाॅर्ड’ प्रदान

प्रतिनिधी पुणे वसुधा नाईक

0 5 1 7 9 7

राज्यातील 40 साहित्यिकांना ‘वर्ल्ड बुक ॲवाॅर्ड’ प्रदान

वसुधा फाऊंडेशनच्या वसुधा नाईक यांनाही पुरस्कार

प्रतिनिधी पुणे वसुधा नाईक

मुंबई: (27 फेब्रुवारी) सृजनशील, प्रतिभासंपन्न समाजाभिमुख लेखनातून शाश्वत साहित्य निर्मितीची क्षमता असणा-या 40 साहित्यिकांना ‘ वर्ल्ड बुक ‘ संस्थेतर्फे नुकताच ‘वर्ल्ड बुक ॲवाॅर्ड -2026 ‘ व्हाटसअप द्वारे वितरीत करण्यात आला.

साहित्य , अध्यात्म , समाज प्रबोधन , सांस्कृतिक संवर्धन, साहित्य संवर्धन, कायदा , फल ज्योतिष , वास्तुशास्त्र, रुग्ण सेवा , रमल , टॅरो रिडिंग, मधमाशी वाचवा मोहिम मंत्रशास्त्र, हायकू लेखन आदि विविध पातळीवर योगदान देणा-या प्रतिभावंतांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ साहित्यिक आणि पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते पुरस्कार निरपेक्ष वितरीत करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर ब्रम्हनाथकर, मिलिंद चिंधडे, वर्ल्ड व्हिजन टाईम्सचे संस्थापक, संपादक प्रा.नागेश हुलावळे , वाचन संस्कृतीचे प्रसारक डाॅ.योगेश जोशी , संत साहित्य अभ्यासक नामदेव थोपटे, ज्येष्ठ लेखक वि.ग.सातपुते, सूर्यकान्त वैद्य , रमल अभ्यासक चंद्रकांत शेवाळे , फल ज्योतिष अभ्यासक विजय जकातदार , रघुवीर खटावकर, उदय साने, डाॅ.जयश्री बेलसरे , डाॅ.रजनी साबदे, डाॅ.सविता महाडिक कवयित्री तनुजा प्रधान, डाॅ.मानसी सगदेव मोहरिल, मंदा नाईक ,कोमल माळी, गझलकार सुधा नरवाडकर, हायकुकार तुकाराम खिल्लारे टॅरो कार्ड तज्ञ प्रा.स्मिता गिरी, ॲड.सुनीता पागे,डाॅ.संजिवनी मुळे, लाल किताब अभ्यासक डाॅ. सीमा गाडेकर, साहित्य आणि सांस्कृतिक संवर्धन क्षेत्रात योगदान देणारे हेमंत नेहते आनंद सराफ, जयंत गुळकरी , रवि गुळकरी, भावना गुप्ता, वसुधा फाउंडेशनच्या वसुधा नाईक , तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या प्रिया दामले , मधुकर्णिका फाउंडेशनच्या मधुकर्णिका सासवडे , अंकज्योतिष आणि पुष्पौषधी
प्रसारक डाॅ.अंजली ठोंबरे आदि प्रतिभावंतांना सन्मानित करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे