0
4
8
3
0
0
शाळेला सुटृया लागल्यातं
दररोज दफ्तर,शाळा आणि घर
पुस्तक सारखे कंटाळले खरोखर
शरीर थकल्य आईबाबा म्हणती
नेहमी अभ्यास कर, अभ्यास कर
धडे, कविता,नको गणिताचा तास
करून पायथागोरस प्रमेय पाठ
इतिहासाचे सनावडी डोके काढी
भूगोलात पोट दुखूणी येई कळ
शाळेला सुटृया लागल्यातं चल
मस्त मौज करू झिंगा धरू फेर
म्हणूनच सखी आज आहे
करू मस्ती शेवटचा पेपर
मामाच्या गावाला जाणार मी
धावत खेळणार रानमाळयात
येताच मामी करणार शिकरण
सर्वाना खायला देणार पटकन
बहीणभावा सोबत खेळणार
लपंडाव,लंगोरी, मैदानी खेळ
नको दफ्तर पुस्तके हातात ही
नंतर शाळा सुरू झाल्यावरचं
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
0
4
8
3
0
0



