सोनम वांगचूकचे ‘त्यागी’ आंदोलन
कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी रोड, नागपूर

सोनम वांगचूकचे ‘त्यागी’ आंदोलन
सोनम वांगचूक असे व्यक्तिमत्व ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या हितार्थ सोनम बांगचूक यांनी दिल्ली येथील जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केले होते. पण 20 व्या दिवसाला आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणाहून सोनम वांगचूक यांना पोलीस पथक येऊन तेथूनन थेट एका बेडशीटवर उचलून दवाखान्यात घेऊन गेलेत. स्ट्रेचर सुध्दा आणले नाहीत. जे प्रदर्शन समर्थक व आंदोलनातील स्वयंसेवक यांना दिल्ली पोलीस उचलून जीपमध्ये कोंबत आहेत. यांच्या मागण्या हयांच आहेत कि, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना निलंबित करावे, जी आता नीट, टिईटी परीक्षेच्या दिवशी जे पेपरफुटी प्रकरण झालेत ते पुन्हा असे होऊ नये, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळू नये, त्याचे वर्ष वाया जातात. अभ्यासाकरीता घेतलेली मेहनत वाया जाते.या त्यांच्या आंदोलनमुळे त्याचे आठ किलो वजन कमी झाले. तत्पूर्वी सोनम बांगचूक यांचे पूर्व जीवन जाणून घेऊ या.
सोनम बांगचूक यांचा जन्म 1966 मध्ये लदाखच्या उमरा या एका छोटयाशा गावात झाला. वयाच्या आठव्या वर्षापर्यंत ते कोणत्याही शाळेत गेले नव्हते. कारण, त्याच्या गावात शाळाच नव्हती. आईकडून मातृभाषेतून शिकले. आणि कदाचित याच मुक्त वातावरणामुळे त्यांच्यात चौकस बुद्धी निर्माण झाली. जेव्हा ते पुढे इंजिनिअरिंग शिकले तेव्हा त्याच्या लक्षात आले की, लदाख मधील पारंपारिक शिक्षण पध्दती स्थानिक मुलांना अपयशी ठरविते. तेथील मुल हुशार असून सुध्दा इंग्रजी किंवा इतर भाषेमध्ये नापास होत होती. ही पध्दत बदलण्यासाठी त्यांनी 1988 मध्ये सेकम म्हणजेच स्टुडंट्स एज्युकेशनल एण्ड कल्चर मूव्हमेंट आयकाॅन लदाख यांची स्थापना केली.ही अशी शाळा होती जिथे नापास झालेल्या मुलांना प्रवेश मिळायचा आणि पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकल शिक्षणावर भर दिला जायचा. जशी ‘थ्री इडियट्स’ मध्ये दाखवितात तशीच शाळा होती.
लदाख मध्ये हिवाळ्यात तापमान खूप कमी असते त्याकरीता सुसंगत अशा इनोव्हेशन व्दारे म्हणजेच त्यांच जे आईस्तूप होतं या सगळया स्थानिक समुदायांना सक्षम केल्याबदल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.2018 मध्ये मिळालेल्या ऐतिहासिक रमन मॅगसे पुरस्काराची संपूर्ण 50,000 अमेरिकेन डाॅलर ची रक्कम म्हणजेच त्यावेळचे सुमारे 34 ते 35 लाख रूपये ही पूर्ण रक्कम त्यांनी लदाखमध्ये आंतरराष्ट्रीय माॅडेल स्कूल आणि युनिव्हर्सिटी सुरू करण्यासाठी दान केली होती.त्यानंतर त्यांना “ग्लोबल अवॉर्ड फाॅर स्सटेनेबल ऑरकिटेक्चर” म्हणून कोणतीही हानी न पोहचवून सौरऊर्जा वापर करून मातीची ऊबदार घरे, शाळा बनवली आणि या सगळयासाठी त्यांना पुरस्कार मिळाला. त्यानंतर वास्तुकलेच्या तंत्रज्ञानासाठी त्यांना पॅरिसमध्ये पुरस्कार देण्यात आला. यानंतर सोनम बांगचूक यांना पर्यावरण, शिक्षण आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले. अशा या थोर व्यक्तिमत्वाचे राजकारण न करता सरकारांनी सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे असलेल्या सोनम बांगचूक यांना योग्य न्याय द्यावा हीच लोकशाहीची खरी ताकद होईल.
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
=========


