0
4
8
2
9
0
अपराजिता
तो गेला तिला मागे ठेवून
दोन लेकरांचं दान देऊन..
रडली, ओरडली, भांडली
नियतीपुढे कर्मकथा मांडली..
पण.. ऐकायला ना होता वाली
एकटीनेच लढायचं होतं भाळी
अनेक नाती दूर गेली
चेष्टा नशिबाने क्रूर केली..
भल्यामोठ्या शून्याखाली
आयुष्याचं एकाकी पान
ती एकटीच त्या बांधावर
सभोवताली माळरान…
सर्वांगी तनुवर काटा आला
भितीने काया काळवंडली
तरीही ती बाभूळ होऊन
एकटीनेच फुलत राहिली..
बद्ध झाली ती जणू
पंखच तिचे कुणी छाटले..
कधी संकटांनी घेरले
भवताल चिखलाने माखले..
तरीही ती मनस्विनी
होऊन फुलली कमलिनी..
संकटांना पाजून पाणी
अपराजिता मानिनी..
अपराजिता मानिनी..!
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे.
=======
0
4
8
2
9
0



