आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगभंडारा
जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे ‘सूक्ष्म हालचाली’ आसन सराव वर्गाचे आयोजन
महिला योगा प्रशिक्षक ललिता जिभकाटे यांनी केले मार्गदर्शन
0
5
1
6
4
1
जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे ‘सूक्ष्म हालचाली’ आसन सराव वर्गाचे आयोजन
महिला योगा प्रशिक्षक ललिता जिभकाटे यांनी केले मार्गदर्शन
पवनी शहर प्रतिनिधी
भंडारा/पवनी: जि प उच्च प्रा शा भोजापूर ता पवनी जि भंडारा येथे आज (दि ९ मार्च) रोजी आरोग्य विभागातर्फे महिला योग प्रशिक्षक ललिता जिभकाटे यांनी मार्गदर्शन करून सूक्ष्म हालचाली’ आसन सराव वर्ग घेतले. आशा वर्कर अल्का वैद्य यांनी सहकार्य केले.
आयोजित योग सराव प्रशिक्षण वर्गात भोजापूर येथील वर्ग १ ते ३ रीच्या विद्यार्थ्यांनी यात उत्साहपूर्ण सहभाग घेत सर्व सूक्ष्म हालचाली व आसने कृतीयुक्तपणे सराव करून घेतला.
दररोज या विद्यार्थ्यांना अशाप्रकारे सराव करून घेणार असल्याचे योग प्रशिक्षक ललिता जिभकाटे यांनी याप्रसंगी सांगितले.
0
5
1
6
4
1



