आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताचंद्रपूरविदर्भसाहित्यगंध
दलितांचा राजा
इंदू मुडे, ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर
0
4
8
2
8
4
दलितांचा राजा
काय खरं काय खोटं
समजायला लागते ज्ञान
त्यासाठी शिका म्हणून
सांगून गेले भीमराव
सत्याची धरून कास
करावा लागतो संघर्ष
निर्भीडता जपून मनात
लढावे लागते अन्याया विरुद्ध
शिका, संघटित व्हा
दिला संदेश महान
बुद्ध विचार वाणीतून
लिहिले भारताचे संविधान
संविधानात दिले त्यांनी
मूलभूत हक्क अधिकार
समता,स्वातंत्र्य, बंधूता
जपण्या संविधानाचा आधार
झाला दलितांचा राजा
भीम माझा झिजला चंदनापरी
महामानवाची अमर गाथा
अजरामर राहील या भूमीवरी.
इंदू मुडे, ब्रम्हपुरी
जिल्हा चंद्रपूर
0
4
8
2
8
4



