
0
5
4
7
2
3
वाचून घेरे
नाचून नाही वेड्या,भीम वाचून घेरे।
जयंती करावया , प्राण लावून घेरे।।
आचार विचार तुझा ,ठेव शुद्ध आता
अष्टांगाला बुध्दाचे, अंगिकारुन घेरे।।
तुला जे मिळाले ती ,पुण्याई भीमाची।
औकातीत राहूनी ,जरा वागून घेरे।।
धर्म जातीपातीत ,भटकतो कशाला।
संविधानाला फक्त ,तू स्वीकारुन घेरे।।
माजून जाऊ नको,त्या दिडदमडीने।
माणसात माणसा ,थोडं वाटून घेरे।।
तुझ्या पूर्वजाची लाचारी केविलवाणी।
जाणून भीमराया ,अंतरी मानून घेरे।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा, जि.यवतमाळ
0
5
4
7
2
3



