Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूर

राष्ट्रीय सेवा योजना (NSS) शिबिराला मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

नागपूर शहर प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

राष्ट्रीय सेवा योजना (NSS) शिबिराला मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

नागपूर (दि २०): दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी बेसा नागपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे १६ ते २१ फेब्रुवारी २०२६ दरम्यान विशेष शिबिराचे आयोजन “अशोकवन” रुई, वर्धा रोड, नागपूर येथे करण्यात आले आहे.

हे शिबिर संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मनोज व्ही. बालपांडे, प्राचार्या डॉ. उज्वला एन. महाजन आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी श्री. सचिन एम. मेंढी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारीला या शिबिराला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (RTMNU) येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) सेलचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी भेट देऊन स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी आधुनिक काळातील राष्ट्रीय सेवा योजना च्या विविध सेवा उपक्रमांची प्रेरणादायी उदाहरणे देत युवकांनी समाजकार्याच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

यावेळी प्रमुख संपादक प्रमोद तिजारे यांनीही उपस्थितांना संबोधित करत शिस्त, संवेदनशीलता आणि जबाबदारी या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी सेवाभाव जोपासून समाजहितासाठी कार्य करावे, असे त्यांनी सांगितले. शैक्षणिक जाणीव आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधणारे हे शिबिर स्वयंसेवकांना नवचैतन्य देत असून राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या खऱ्या भावनेशी बांधील राहण्याची प्रेरणा देत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे