बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या
आवर्जून दर्जेदार रचनांचा आस्वाद घेऊया
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट अकरा🌈🌈🌈*
*🥀विषय : रंग वसंताचे*🥀
*🍂बुधवार : १२ / मार्च /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*रंग वसंताचे*
*रंग वसंताचे विखुरले*
*अवघ्या सृष्टीवर*॥
*विश्वास बसत नाही*
*या सुखद बदलाचे दृष्टीवर*॥॥॥॥
*डाॅ.नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे..*
रंग वसंताचे असे उधळले
आसमंती सप्तरंगांची नक्षी
नेत्रसुख जणू भासे मनमोहक
सुखावण्या साऱ्यांच्या अक्षी..
*सौ.प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव- रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे*
निसर्गाने दिले भरपूर
नाही कमी मानवाला
चला उधळू रंग वसंताचे
हे साजेसे होईल माणुसकीला
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे*
मनोहारी रंग वसंताचे
सृष्टीत नवरंग खुलले
शब्दगंध मनी बहरले
पानांवर काव्य उमटले
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे*
रंग वसंताचे चैत्रात फुलले
नववर्षाच्या स्वागतासाठी
नवीन पालवी फुटू लागली
गुढी उभारली लावून गाठी
*विजय शिर्के , छं . संभाजी नगर .*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*चारोळी–रंग वसंताचे*
उधळले रंग वसंताचे
स्वागत करण्या नववर्षाचे
सृजनाचा ऋतू आगळा
पारणे फेडी डोळ्याचे
*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे*
रंग वसंताचे उधळताना
दिसे रंगीबेरंगी फुलांवर
नवचैतन्याची बहर येई
सृष्टीतील चराचरावर
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे*
रंग वसंताचे लेऊन
बहरली अवघी सृष्टी
नाना रंगाची उधळण
निवली जीवन दृष्टी.
*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दा.न.ह.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १६२ साठी आजच साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*चारोळी _रंग वसंताचे*
विविध रंगी ,विविध ढंगी
रंग वसंताचे
नाजूक, सुंदर,मोहक ,प्रेमळ
बंध नात्याचे
*सौ.शशी मदनकर ब्रह्मपुरी*
*जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे*
चराचरात भरले नवचैतन्य
फुलून येता रंग वसंताचे
अंकुराली पालवी रणीवनी
सौंदर्य खुलले निसर्गाचे
*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
*रंग वसंताचे*
कोकिळेच्या मंजुळ स्वरांनी
मंत्रमुग्ध रूप निसर्गाचे
उधळीत बरसात फुलांची
सजतात रंग वसंताचे
*सौ अर्चना जगदीश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌲🍂🌲➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



