आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितागोंदियानागपूरसाहित्यगंध
सुखाच्या वाटा
रंजना राहुल ब्राह्मणकर अर्जुनी/मोर, जि. गोंदिया

0
5
1
7
9
6
सुखाच्या वाटा
चालत होतो डोंगराच्या घाटा
शोधत मी सुखाच्या वाटा
क्षणभंगुर आहे जीवन मोठा
वेड्या मना स्वप्न झाला खोटा||
धावलो मी मृगजळाच्या मागे
सावध झालो झोपेतून जागे
विव्हळत होतो घेऊन भूतकाळ
समोर दिसेना भविष्यकाळ||
समोर उभे होते तीन दिपस्तंभ
म्हणाले कसे, रहा तु ठाम
प्रेमात मिळेल मायेची ऊब
राहू आनंदी समाधान खूप||
शिक्षण घेऊ होऊ खूप मोठे
वाटेत आले संकटाचे काटे
सोसले आम्ही दुःखाचे चटके
कष्टासमोर वाटेल गगनही छोटे||
चढू नकोस आता डोंगराचा घाटा
क्षणभंगुर जरी जीवन आहे मोठा
स्वप्न आता होणार नाही खोटा
आम्ही परत देऊ सुखाच्या वाटा||
रंजना राहुल ब्राह्मणकर
अर्जुनी/मोर, जि. गोंदिया
0
5
1
7
9
6



