Breaking
चारोळीनागपूरविदर्भ

गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 4 8 2 9 0

*????संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट बारा????????????*

*????️विषय : तू फक्त हो म्हण????️*
*????गुरूवार : २४ / १० /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*तू फक्त हो म्हण*

झुकलेली नजर सांगते
तुझ्या मनातला गुपीत
तू फक्त हो म्हण सखी
आजन्म राहीन सोबत

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*तू फक्त हो म्हण*

शब्द मुके होतात….
तेव्हा नजर तुझी झुकते…
प्रिये, तू फक्त हो म्हण…
जपेन मी आनंदाचे सारे क्षण…

*सौ. हर्षा कुणाल सहारे, नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*तू फक्त हो म्हण..*

नको ना अशी निराश होऊस
उठ ना परत निश्चयानी
गेलेलं सगळं परत मिळेल
तू फक्त हो म्हण विश्वासानी…

*सौ. प्रज्ञा सवदत्ती गोरेगाव-रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह.*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*तू फक्त हो म्हणं*

तू फक्त हो म्हणं
आयुष्य नव्याने सुरू करू
विसरून एकमेकाच्या चुका
एकमेकावर प्रेम करू

*विजय शिर्के , छं . संभाजी नगर .*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*तू फक्त हो म्हण*

तू फक्त हो म्हण राणी
अंतर्मुख होऊन जाऊ नकोसनी
विरोधकांना पाजूया पाणी
संसार थाटू आपण रानीवनी

*सौ लता आरेकर इचलकरंजी*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*तू फक्त हो म्हण*

कशाचा करतोस विचार
मनाचा करतो हलका भार
तू फक्त हो म्हण आता
थाटू आपण योग्य संसार

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*तू फक्त हो म्हण*

किती शांत तुझी प्रतिमा
दिसतेस तू किती भारी
तू फक्त हो म्हण
करतो लग्नाची तयारी

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*तू फक्त हो म्हण*

नकोस होऊ उदास ,
येईल तो पण क्षण खास ,
तू फक्त हो म्हण आज
घेऊन दत्तक पुत्र राज .

*सौ.माधुरी हेमराज लांजेवार*
*मु.नागपूर ता.नागपूर जि.नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*तू फक्त हो म्हण*

कसं होईल गं माझं
तुझ्याविना गं जगताना
तू फक्त हो म्हण आज
राणी बनून करशील राज

*श्री.संग्राम कुमठेकर,लातूर*
*©️ सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*तू फक्त हो म्हण*

तुला पाहताच सजने
झालो मी गं दिवाना
तू फक्त हो म्हण
तुझ्याकडे होतो मी रवाना

*सुनंदा किरसान*
*अर्जुनी मोर गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*तू फक्त हो म्हणं…*

तू आणि मी वेगळे आहोत का दोघेजण
तुझ्यातच दडलय माझं मी पण
तू तर माझ्या हृदयातली प्रेमाचं कोंदण
दाखवू का उघडून तू फक्त हो म्हणं…

*सौ अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*तू फक्त हो म्हण*

बाळा शिकायला तू फक्त हो म्हण
त्यासाठी मी कितीही कष्ट करेन…
तुझ्या शिक्षणाच्या खर्चासाठी
मी एखाद्याचे साल ही धरेन……

*सौ स्वाती तोंडे पाटील*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे