शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक राहुल पाटील

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सात🌈🌈🌈*
*☄विषय : अंधारयात्री☄*
*🍂शनिवार : ३१ / मे /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*अंधारयात्री*
तो होता बिचारा अंधारयात्री
होता चाचपडत काळोखात
घेतलेले कर्ज फेडण्यासाठी
सावकाराघरी होता राबत.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌒💥🌒➿➿➿➿
*अंधारयात्री*
*सकल अंधारयात्रींनी*
*जावे प्रकाशाकडे*॥
*जीवनात विशालता मागावी*
*अगाध आकाशाकडे*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌒💥🌒➿➿➿➿
*अंधारयात्री*
अंधारयात्री चिरून तम
करून प्रवेश तेजाकडे
जीवन ऊन-सावलीचा खेळ
गिरवतेय उपजीविकेचे धडे
*सौ.भावना अजय इटकीकर अकोला*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌒💥🌒➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*अंधारयात्री*
युगानं युगाचा अंतरी
तराळ अंतराळयात्री
नभ हिंडे चौहीकडै
मी एक अंधारयात्री…
*शिवाजी नामपल्ले*
अहमदपूर जि.लातूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌒💥🌒➿➿➿➿
*अंधारयात्री*
आईच्या सोनेरी सहवासे
कुणीही नसते अंधारयात्री,
आनंदाने आनंदच पेरणारी
आईच मूर्तीमंत आनंदयात्री.
*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌒💥🌒➿➿➿➿
*अंधारयात्री*
चाचपडतो वाटसरू
मदतीस, अंधारयात्री,
काजवाच्या प्रकाशाने
उजळे काळोख राती.
*मायादेवी गायकवाड ठोकळ*
*मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌒💥🌒➿➿➿➿
*अंधारयात्री*
जगी आशावादी अंधारयात्रींनी
कधी सोडू नये आशा
आजपेक्षा उद्याचा दिवस
उज्वल असेल जसा दिवा
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌒💥🌒➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖





