‘बारामतीचा चमत्कार बघितला ना’
अजित पवारांच्या काटेवाडीतून शरद पवारांचा इशारा
‘बारामतीचा चमत्कार बघितला ना’
अजित पवारांच्या काटेवाडीतून शरद पवारांचा इशारा
बारामती: शरद पवार यांनी नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकांवर भाष्य करताना काटेवाडीकर नेहमीच माझ्या पाठिशी राहिल्याचं म्हटलं. ही निवडणूक साधी सोपी नव्हती, अजित पवारांच्या काटेवाडीतून शरद पवारांचा इशारा; मोदींना म्हणाले, बारामतीचा चमत्कार बघितला ना
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांचे बारामती दौरे वाढले असून आगामी विधानसभा निवडणुकांसाठीही त्यांनी रणशिंग फुंकल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी बारामतीमधील (Baramati) व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात उपस्थिती दर्शवत बारामतीच्या विकासासाठी वेळ पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घ्यायला मागेपुढे पाहणार नसल्याचं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं होतं.
त्यानंतर, वडगाव निंबाळकर गाव दौऱ्यातून येथील जनता गेल्या 57 वर्षांपासून माझ्या पाठिशी असल्याचं त्यांनी म्हटलं. लोकसभा निवडणुकीत येथील जनता आपल्या पाठिशी राहिली. गेल्या 57 वर्षांपासून आपण सर्वजण माझ्या पाठिशी आहात, असेही पवार यांनी म्हटले. तसेच, नाव न घेता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दमदाटीवरुनही टोला लगावला होता. आता, शरद पवारांचं जन्मगाव असलेल्या काटेवाडीतून त्यांनी थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले.