0
4
8
2
8
4
रंग होळीचा
रंग होळीचा खेळताना
घ्यावी दक्षता बाळगून
नको व्हाया रंग बेरंग
जातील सारेच पळून
जपू परस्पर भावना
नको कधी अवहेलना
प्रेम जपू या अंतरीचे
रंग होळीचा खेळताना
टाकू गाढून मद,मोह
राग,लोभ व लालसेला
हर्ष पसरवू निखळ
अर्थ येवू दे जगण्याला
रंग होळीचा खेळताना
रंगात रंगुनी जाऊया
सप्तरंगी इंद्रधनुची
छाप जीवनात सोडूया
रंग होळीचा खेळताना
‘ज्ञानाग्रज’ असे तत्पर
शुभेच्छा देई सकलांना
जोडुनिया हे दोन्ही कर….
जोडुनिया हे दोन्ही कर….
दत्ता काजळे
उमरगा जि.धाराशिव
0
4
8
2
8
4



