
0
4
8
3
0
0
कासव गती
गर्विष्ठपणा नसेल मनी तर
दिवस सोनेरी निश्चित येतील
होईलच स्वप्न पूर्ण अपूले
कासव गती जरी असेल
ध्येय सोडू नका कधीही
आयुष्य बदलेल नक्की
कष्टातूनच आनंद दरवळ
खूणगाठ बांधा मनाशी पक्की
प्रयत्न असफल झाले जरी
निराशा नको मनी हरण्यात
कासव गतीने यश मिळेलच
परीवर्तन होईल जीवनात
शर्यत नको कुणाशी कधीच
चिमुकल्यांना धडे देऊया
नित्य अभ्यासाची सवय लावून
मुलांचे आपण आयुष्य घडवूया
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल, जि. चंद्रपूर
0
4
8
3
0
0



