Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखबीडमराठवाडाविदर्भसाहित्यगंध

“ऋणगंधित भाव मनाचे… शब्दपुष्प कृतज्ञतेचे”; राजश्री ढाकणे

राजश्री मिसाळ ढाकणे बीड

0 5 2 4 6 3

“ऋणगंधित भाव मनाचे… शब्दपुष्प कृतज्ञतेचे”; राजश्री ढाकणे

जादुई फार
तीन शब्द दादांचे
दान हर्षाचे

सर्वांना सस्नेह रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

काल दिनांक 25-03-2026 ला माझ्या “हायकू काव्य “रचनेची आजची “सर्वोत्कृष्ट हायकू काव्य रचना “या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत निवडून लेखणीला सन्मानित केल्याबद्दल मी सर्वप्रथम हायकू प्रशासन समितीचे ऋणाभार व्यक्त करते…!..तत्पूर्वी थोडेसे मनातले ऋणभाव /अंतर्मनातील काही खास शब्द मराठीचे शिलेदार परिवारासाठी…!

“तुमचा फोटो पाठवा” हाच तो तीन शब्दांचा जादुई मेसेज जेव्हा दादांचा येतो ना… काय तो अवर्णनीय आनंद गगनात मावत नाही… आनंदाचा बार मनातल्या मनात उडून एक स्मित हास्य चेहऱ्यावर पसरतं.. वेगळीच ऊर्जा लेखणीत संचारते…पण आज सकाळी दादांचा मेसेज आला का यासाठी मी दोनवेळा मोबाईल बघितला तर दादांचा “जादुई मेसेज” नव्हता. मग दोन समूहात डोकावले तर सर्वोत्कृष्ट पोस्टर पण दिसले नाही… मग मी हायकू, चारोळी, चित्र चारोळी रचना दिलेल्या विषयावर तयार करून पाठवल्या आणि मग देवपूजा करून रामाचे गाणे ऐकत स्वयंपाक सुरू केला. पण स्वयंपाक करताना सुद्धा डोळ्यासमोर शिलेदार समूहच होता…मध्येच दोनवेळा उगीच मनात आलं दादाचा “जादूई मेसेज” जर येऊन गेला पोस्टरसाठी तर फोटो पाठवायला उशीर होईल.

पुन्हा मनात म्हणले दादा सकाळीच आठ ते नऊच्या दरम्यान मेसेज पाठवतात आता साडेनऊ झालेत आता नाही येणार मेसेज कारण रामाचे गाणे अर्धवट बंद करू वाटत नव्हते स्वयंपाक करण्यात हात पण रिकामे नव्हतेच… पण मेसेज आला असेल असच मनात वाटत होतं मग स्वयंपाक झाला आणि मोबाईल हाती घेऊन बघितलं तर खरंच दादाचा जादुई मेसेज दिसला 9.37 ला आलेला मी पाहिला 11.30 ला. पोस्टरसाठी फोटो पाठवला पण आता दादा मनातल्या मनात रागावले असतील अशी आदरयुक्त भीती वाटली… पण आज दादा रागावले नाहीत प्रभू श्रीरामाची कृपा माझ्यावर झाली..!

कारण श्रीराम जन्म दुपारी 12.00 वाजता होतो आणि त्यानंतर दादांनी “सर्वोत्कृष्ट हायकू पोस्टर” समूहात प्रसारित केले… आहे की नाही आजच्या दिवशी “प्रभू श्रीरामाचा प्रसाद माझ्यासाठी…!”.. कारण सकाळी मी दोनवेळा मेसेज बघूनही मेसेज नव्हता पण प्रभू श्रीरामानी आ. दादांना सुचविले असेल साहित्यिक सन्मान रूपी प्रसाद द्यायला… हा दुर्मिळ योग मला लाभला खरंच मी भाग्यवान आहे आणि त्याआधी “शिलेदार परिवाराची कृतज्ञ आहे..!”

कातरवेळी
तरुखाली तरुणी
उदास मनी

हेच ते हायकू काव्य होते जे आज सर्वोत्कृष्ट पोस्टर मध्ये संपूर्ण शिलेदार परिवाराच्या..प्रेरणादायी अभिनंदनीय पुष्पवर्षावात चिंब चिंब भिजले होते सर्वांचे ऋणगंधित धन्यवाद..! जेव्हा सर्व विषयावर लिखाण होते ना त्यादिवशी खूप छान वाटते कारण काहीका होईना “माय मराठी” लेखणीतून दर्शन घडवते आणि मग आनंद याचा होतो की, आजचा दिवस सत्कारणी लागला…!

आता वेळ ऋणाभाराची. सर्वप्रथम या शिलेदार परिवाराचे सर्वेसर्वा लाखो व्यक्तींना साहित्यिक बनवणारे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारे, माय मराठीसाठी आपला प्रत्येक श्वास घेणारे…ध्येयवेडे आणि कुशल संस्थापक, संपादक, नावीन्यपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक, देवांश म्हणजे आपले आ. राहुल दादा पाटील, सावली सारखी अहोरात्र साथ देणाऱ्या आ. सौ. पल्लवीताई, मुख्य प्रशासक /परीक्षक /कार्यकारी संपादक माझी सखी प्रिय सविता पाटील ठाकरे, आ. प्रशांत भाऊ ठाकरे,हायकू काव्याचे मुख्य परीक्षक आ. विष्णुदादा, आ.संग्राम दादा, आ. अशोक दादा, आ.अरविंद दादा,प्रिय स्वाती ,प्रिय वृंदाताई,प्रिय शर्मिला ताई, प्रिय तारकाताई, प्रिय प्रतिमा ताई… साप्ताहिक साहित्यगंधचे सर्व संपादक मंडळ… अगदी सर्वांचे मनःपूर्वक ऋणयुक्त अनंत धन्यवाद. माझ्या लेखणीवर नेहमीच कौतुकाचा वर्षाव करणारे… अर्थात लेखणीची ताकद /बळ असणाऱ्या शिलेदार परिवारातील सर्व आ. दादा /ताईंचे मनःपूर्वक खूप खूप ऋणयुक्त अनंत धन्यवाद…!…सर्वांच्या साहित्यिक प्रवासास अभिनंदनीय शुभेच्छा…!!

➿➿➿➿🔹🎋🔹➿➿➿➿
राजश्री मिसाळ ढाकणे बीड
शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा
सदस्या – मराठीचे शिलेदार समूह
➿➿➿➿🔹🎋🔹➿➿➿➿

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 4 6 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे