Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

चिमाजीअप्पा पेशवे यांच्या स्मृतींना अभिवादन

अमृता खाकुर्डीकर,पुणे प्रतिनिधी

0 4 8 2 8 6

चिमाजीअप्पा पेशवे यांच्या स्मृतींना अभिवादन

पराक्रमी पेशव्यांचे हृद्य पुण्यस्मरण

अमृता खाकुर्डीकर,पुणे प्रतिनिधी

पुणे: (दि.17डिसे): (प्रतिनिधी) भारतीय इतिहासातील मराठेशाहीतले पराक्रमी सेनापती आणि अजिंक्य योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव जसे सुवर्ण अक्षरांना लिहीले आहे, तसेच या मराठे राज्याच्या विजयासाठी सदैव कटीबध्द असलेले राऊंचे धाकटे बंधू ‘श्रीमंत चिमाजीअप्पा पेशवे’ यांचेही महत्वाचे योगदान आहे.

चिमाजीअप्पांनी मोठ्या निकराची झुंज देऊन पोर्तुगिजांच्या ताब्यातील वसईचा किल्ला आणि साष्टी बेट जिंकून घेतले होते. हे साष्टी बेट म्हणजेच सध्याचा मुंबई उपनगरातील वांद्रे ते डहाणू असा मोठा समुद्र किनारी पट्टा. हा भूभागाचे तत्कालीन महत्व लक्षात घेता त्यावेळी चिमाजी आप्पांच्या परक्रमाचेही महत्व अधोरेखित झाले. त्याचबरोबर शनिवारवाडा आणि पेशवाईतला दप्तरी कारभार कुशलतेने सांभाळण्यातही त्यांची मोठी भूमिका होती. अशा युध्द निपुण आणि व्यवस्थापन कुशल श्रीमंत चिमाजी आप्पांची आज २८४ वी पुण्यतिथी. त्यानिमित्त चिमाजी आप्पांचे पुण्यस्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले असल्याची माहिती इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे