कविताखानदेशदादरा नगर हवेलीनागपूरविदर्भसाहित्यगंध
ढगाआडचा चंद्र; सुजाता सोनवणे
0
4
8
2
9
4
ढगाआडचा चंद्र
ढगाआडचा चंद्र तू
खेळत असतो लपंडाव
शुक्राची चांदणी मी तुझी
घेतो मनाचा अचूक ठाव.
दूर थोडा गेला तर
विरह मला साहवेना
तुला पाहिले नाही तर
चैन या जीवाला पडेना.
दुज्या कित्येक तारकांसवे
जरी तू कधी रमतो खास
माझी उणीव मात्र निश्चित
तुझ्या मनात माझाच ध्यास.
तुजवीण सख्या हे जीवन
उदास भासते रे हरघडी
निसर्गाचा नियम असला
तरी वाटते मारू नकोस दडी.
तुझा मागोवा घेत मी
नक्कीच येईन स्वप्नात
जन्मोजन्मीचा सखा तू
तुझीच आस मम मनात.
नित्य हवीय मला तुझी
सख्या प्रेमळ साथसंगत
अमावस्येच्या रात्रीही मग
जीवनी पौर्णिमेचीच रंगत.
सुजाता सोनवणे.
सिलवासा दादरा नगर हवेली.
===========
0
4
8
2
9
4



