Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनवी दिल्लीमहाराष्ट्र

प्रजासत्ताक दिनी अलिबागचे विद्यार्थी दिल्ली कर्तव्यपथावर

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 9 7

प्रजासत्ताक दिनी अलिबागचे विद्यार्थी दिल्ली कर्तव्यपथावर

जे. एस. एम. च्या विद्यार्थ्यांनी सादर केले पारंपरिक नृत्य

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग: दि. २६ जानेवारी रोजी भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनानंतर भारताचे माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी तसेच प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित इंडोनेशियाचे राष्ट्रपती माननीय प्रबोवो सुबियांतो यांच्या उपस्थितीत ‘जयती जय मम भारतम’ या संकल्पनेवर आधारीत भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे सादर झालेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जे. एस. एम. कॉलेजच्या श्रेया अधिकारी, अथर्व भगत, नेत्रा जोशी, सार्थक शेळके, प्रणव टावरी, हिमानी रिसबूड, श्रुती नाईक या विद्यार्थ्यांनी लावणी, कोळी नृत्य, वारी, महाराष्ट्रातील इतर काही आदिवासी नृत्य या नृत्य प्रकारातील आपली नृत्यकला सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. जे. एस. एम. कॉलेजसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

अथर्ववेद परंपरा कलामंचचे श्री. लक्ष्मण पडवळ यांच्यासह दिल्ली येथे जवळजवळ एक महिना सराव शिबिरात सामील झाल्यानंतर प्रजासत्ताक दिनी आपली नृत्यकला सादर करण्याची संधी या विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. ५००० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सादर केलेल्या या नृत्याविष्काराची नोंद गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये देखील घेतली जाणार आहे.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतमभाई पाटील, उपाध्यक्ष मा. डाॅ. साक्षी पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील यांच्या शूभहस्ते सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार आज दि. २९ जानेवारी रोजी महाविद्यालयात करण्यात आला. रायगड (दक्षिण) जिल्हा सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रा. जयेश म्हात्रे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. श्वेता पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे

अथर्ववेद परंपरा कलामंचचे श्री. लक्ष्मण पडवळ यांच्यासह दिल्ली येथे जवळजवळ एक महिना सराव शिबिरात सामील झाल्यानंतर प्रजासत्ताक दिनी आपली नृत्यकला सादर करण्याची संधी या विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. ५००० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सादर केलेल्या या नृत्याविष्काराची नोंद गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये देखील घेतली जाणार आहे.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतमभाई पाटील, उपाध्यक्ष मा. डाॅ. साक्षी पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील यांच्या शूभहस्ते सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार आज दि. २९ जानेवारी रोजी महाविद्यालयात करण्यात आला. रायगड (दक्षिण) जिल्हा सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रा. जयेश म्हात्रे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. श्वेता पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे