बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील निवडक रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट आठ????????????*
*????विषय : सख्यांगणी????*
*????बुधवार : २३/ १० /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*सख्यांगणी*
सुखाची धार….
आनंदाची बरसात
सख्यांगणी मग
उणी कशाची बात ?
सख्या तू आणि मी
नित्य असता सोबती
दुःखही शोधी पळवाट
उरेल कशाची भीती…?
सख्यांगणी निज रात्री
तम काळोख पसरला
सखा होऊन काजवा
मजसाठी उजळला….
दिन नवा उगवता पूर्वी
सोनेरी रविकिरणे पडती
सख्यांगणी मम मनी
नवआशेची कारंजी उडती
*सौ.वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*सख्यांगणी*
कधीपासूनी टाळत आहे
भेटीसाठी जाळत आहे..
किती जीवाला घोर असा हा
नियम कोणते पाळत आहे?
सुकले बघ पान अन् पान
कधी होईल हिरवे रान..
वाट पाहून सारी सुकली
पाऊस होईल का धमासान?
किती गं करशील राग राग
अन् किती ओतशील आग..
जळणारे ते जळत राहतील
आपण गाऊया का प्रेमराग?
पत्ता नाहीतर लोकेशन दे
कोपरे सारे उजळून निघू दे..
किती भाव झटका तुझा हा
रीत मौनाची गं सोडून दे..
सांग कितीदा ठरवली वेळ
तसा झराही होता निर्मळ..
अंतिम निर्णय तुझ्याच हाती
तरीही आडवा आला काळ?
पावसातही हा उन्हाळा का?
सांगशील हा वनवास का?
चौकट भिंती गेट ओलांडून
सख्यांगणी तू येशील का?
सांग,सख्यांगणी तू येशील का?
*सौ सविता पाटील ठाकरे*
*सिलवासा, दा.न.ह.*
*प्रशासक,मुख्य परीक्षक, कवयित्री, लेखिका*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*सख्यांगणी*
सप्तपदी चालून साजना
बनली तुमची स्वामिनी
तूच माझा मन मित प्रीत
अवघी रमली सख्यांगणी.
कंकण बांधले या हाती
आजन्म जुळली नाती
सजना तुझ्या सहवासात
उजळल्या संसार ज्योती.
सौभाग्याचं लेणं माझं
काळजाचा माझा धनी
क्षणोक्षणी तुझी साथ
आधारवड माझा जीवनी.
तुच माझा ध्यास अन्
तुच खरा माझा विश्वास
तुच माझी आस अन्
तुच माझा निरंतर श्र्वास.
तू सागर मी सरिता
तुलाच अर्पित तनमन
तुझ्यासवे बहरले माझे
अनमोल संसारजीवन.
नभांगणीचा तारा माझा
तुझीच मी चकोर चांदणी
क्षणोक्षणीची तुझी साथ
सुखावते मज अंतर्मनी.
*सौ.सुजाता सोनवणे*
*सिलवासा दादरा नगर हवेली.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*सख्यांगणी*
तो चंद्र उगवला नभी
क्षितीजावरी लख्ख छान
चंदेरी सोनेरी शीतल किरणे
उगाच मुरडती ललना मान
जाता येता उंच धरेवर
रूजल्या किरणांच्या वाती
जोडून बसली अनाहुतपणे
निर्व्याज अलवार नाती
बहरला पारिजात दरवळे
मधू झिरपतो सख्यांगणी
फेर धरूनी टिपऱ्यावर
सौंदर्यवती डोलती अंगणी
निनादला सूर बासुरीचा
डफावर पडली गड्या ताल
रूणझूण पैंजण पायी वाजती
ठेक्यात बदलती चाल
पाहूनी मदमस्त तालनृत्य
नभी शशीकरही लाजला
पांघरून गर्द नभाची शाल
हृदयी पडघम प्रितीचा वाजला
*सविता धमगाये, नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*सख्यांगणी*
जशी चांदणी चमचम
चमकते या नभांगणी
मिरवेन म्हणते तशीच
मी आता सख्यांगणी.. //
आर्जव किती दिसांचे
म्हणतेय त्याचे मानेन
गूज त्याच्या ह्रदयीचे
मी सर्वार्थाने जाणेन.. //
मोडेन म्हणते मौनव्रत
मी तोडेन सारी बंधने
त्याच्यासाठी माझीही
धडकताहेत स्पंदने.. //
तो व्याकुळ आर्ततेने
घालतोय मलाच साद
देईन म्हणते प्रतिसाद
या कानी घुमतोय नाद.. //
उचंबळतोय आतून
तो जणू सागर तटस्थ
होईन म्हणते सरीता
मीही आता ह्रदयस्थ.. //
नकोच वाटतेय आता
मला पण, परंतु, नंतर
मिटवू पाहते कायमचे
तना मनातले हे अंतर.. //
तो बांधेल प्रितमहाल
मी रचेन सुवर्ण कळस
होवून जाईन कायमची
सख्यांगणी ची तुळस.. //
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*सख्यांगणी*
तेच सुखस्वप्न लोचनात
रोज मी होते रंगवले
कधी तरी रुणझुणतील
सख्यांगणी माझी पाऊले
सप्तपदी मी चालताना
स्वप्नची ते सत्यात आले
आनंदाचा बहर मनी
तुझे नी माझे नाते जुळले
या घरची मी झाले राणी
मनी गंधाळली रातराणी
अधरावरी किती उमलल्या
नादावल्या राग रागिणी
सासू सासरे दीर नणंदा
किती जुळले बंध रेशमी
अवघे मायेचे हे गोकुळ
प्रेम देतसे गर्भ रेशमी
हळुवार तू जवळी घेता
मनात फुलते मधुर चांदणे
अधरावरती माझ्या उमटती
तुझ्या प्रीतीची गोड गोंदणे
करात गुंतता तुझिया हे कर
मनात माझ्या नुसती थरथर
मिठीत तुझिया मला लाभते
जन्मजन्मीचे सौख्य शुभंकर
सख्यांगणी पारिजात जाई
गंधाची उधळण करते
वृंदावनी तुळस गोजिरी
सौभाग्याचे दान ची देते
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*सख्यांगणी*
सख्यांगणी भासे हृदयीचे अंगण,
जशी हास्याची लाजरी फुल
दोन मनीचे फुलले स्नेह बंधन।
जोडीने प्रीतीचे मग स्वप्न सजल…
तुझ्या नजरेत नाचे चांदणं प्रकाश,
हवेच्या गारव्यात गंधाळली चाहूल
कधी मंद, कधी तेजस्वी सहवास
माझी मलाच पडे अनामिक भूल
चंद्रासन नित्तळ तुझं शांतं हसणं,
नाजूक पावलांची ती गोड खूण
अनंत क्षणात मी हरवून जाणं।
हृदयाने वाजवावी सप्तरंगी धून …
तुझ्या संगतीनं दिस रात हर्षित
स्वच्छंदी मन माझे चोफेर बागडत
आयुष्याच्या वाटां झाल्या सुगंधित
पुन्हा पुन्हा वळून सख्यांगणी येत
कसे शब्दात वर्णनावे माझ्या
सख्याचे ते सख्यांगण
जन्मोजन्मीचे जोडलेले
जीवा शिवाचे बंधन….
*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*सख्यांगणी*
सख्यांगणी गणेशाला प्रिय
लाल सुमनांची ती जासवंदी
रोज नव्याने फुलताना भासे
नववधूपरि किती ती आनंदी…!!
सख्यांगणी प्रेमफूल गुलाब
अवघ्या फुलांचा तो राजा
बनून प्रेमाचे प्रतिक सर्वांच्या
स्वतः सोसून काट्याची सजा…!!
सख्यांगणी चंदणीपारि आहे
बेधुंद निशा करणारी रातराणी
आजूबाजूचे शेजारी चर्चा एक
मंदगंध कौतुकाची उधळणी…!!
सख्यांगणी जीव की प्राण
भर उन्हात फुलतो मोगरा
सण उत्सव करितो खास
कुंतलातील शुभ्र गजरा….!!
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षीका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन* ????
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖



