
0
4
0
8
9
0
ढगा रे ढगा
ढगा रे ढगा ,तू येतो कसा
पावसाच्या धारा आणतो कसा?
तू आकाशातून येतो माहीत आहे मला
तू वर कसा जातोस सांग बघू मला
ढग म्हणाला थांब रे बाळा
इतकी काय घाई ,लागेल तुझा लळा
समुद्राच्या पाण्याची होते बघा वाफ
दिसते का डोळ्यांशी वर जाणारी वाफ
वाफेचे होतात आकाशात ढग
सारे मिळून आम्ही फिरतो छान मग
लागते ढगांना थंडगार वारा
बरसतो आम्ही घेऊन पावसाच्या धारा
सुनंदा किरसान
अर्जुनी मोर गोंदिया
======
0
4
0
8
9
0





