0
4
8
2
9
0
रणरागिणी
नाहीस अबला तू तर रणरागिणी आहे
दिव्य तेजस्वी बलशक्ती तुझ्यात आहे !
सहन करू नको अन्याय अत्याचाराला
जागवं तुझ्यातील वाघिणीच्या बळाला !
बळी पडो न कुणाच्या गोड बोलण्याला
जागृत रहावे ओळखून राक्षसी वृत्तीला !
आठवं तू इतिहास विक्रमी पराक्रमाचा
कर्तबगार क्रांतिकारी आदर्श महिलांचा !
प्रेम जिव्हाळा संस्कार आहे तुझचं सारं
प्रसंगोपात क्रूरतेचं अंगी संचारू दे वारं !
तू आहेस रूपवती,सौंदर्यवती गुणवान
गिधाडाच्या नजरेने बघतात लोकं घाण !
नजरा खाली झुकवण्याची हिंम्मत ठेव
तुझ्या वागण्या बोलण्यातून वाटावं भेव!
कोणत्याही क्षेत्रात तुझं वर्चस्व गाजावं
पाहणाऱ्यानं मनोमन थोडं तरी लाजावं !
कार्यालयात,रस्त्यावर निर्भीडपणे जग
रणरागिणी आहेस म्हणतील तुला मग !
बी.एस.गायकवाड
पालम, परभणी
=======
0
4
8
2
9
0



