0
4
8
3
0
0
सांग कधी कळणार तुला
सांग तुला कळणार कधी
भाव माझ्या मनातला
शब्दा वाचून उमगणार कधी
खेळ सारा मुक्या नात्यातला
सांग कधी कळणार तुला
मनातील भावभावनांचे गुपित
शब्दांमध्ये अंतर तुला नाही कळले
मोबाईल मध्ये असतो सतत
प्रेम प्रीत माझ्या मनातली
शब्दा शब्दातून व्यक्त होताना
आठवण होते क्षणाक्षणाला
मनातलं गुढ सांग जाताना
फक्त तुझ्या आठवणीत
जगत आहे सुखी राहण्यासाठी
तुझ्या माझ्या भेटीतले क्षण आठवतात
मनाला उजाळा देण्यासाठी
विरहाच्या आगीत तळपतोय
कडू गोड आठवणीच्या स्पर्शात
सांग कधी कळणार तुला
इतिहास साठवलाय हृदयात
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
=========
0
4
8
3
0
0



