ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध
करता येईल तर करुन पहावे
भुमेश्वरी सातपुते (खोंडे) ता. उमरेड जि. नागपूर
0
4
8
3
0
0
करता येईल तर करुन पहावे
करता येईल तर करून पहावे
माणसासारखे वागून पहावे
नेता बनून सगळेच देतात भाषण
माणुसकीला जपून पहावे.
करता येईल तर करून पहावे
इतरांसाठी जगून पहावे
सगळेच रडतात स्वतःच्या दुःखात
दुसऱ्याच्या दुःखात रडून पहावे.
करता येईल तर करून पहावे
दिन दुबळ्यांना आधार देऊन पहावे
सगळेच जगतात स्वतःसाठी
या राष्ट्रासाठीही जगून पहावे.
करता येईल तर करून पहावे
मुलींच्या जन्माचे स्वागत करावे
‘ती’ ही घेते अवकाशात भरारी
इतरांना सांगून पहावे.
करता येईल तर करून पहावे
प्राणीमात्रांवर प्रेम करावे
सगळेच पोसतात कुत्रे -मांजरं
अनाथांना आधार देऊन पहावे.
भुमेश्वरी सातपुते (खोंडे)
ता. उमरेड जि. नागपूर
0
4
8
3
0
0



