Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजननवी दिल्लीमहाराष्ट्रमुंबई

जे. एस. एम. महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

तषार थळे, जिल्हा प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

जे. एस. एम. महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम यशस्वी

तषार थळे, जिल्हा प्रतिनिधी

अलिबाग: दि. 2/10/2024
जे. एस. एम. महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. गौतम पाटील व प्राचार्या डॉ.सोनाली पाटील यांनी महात्मा गांधीजी व लाल बहादूदूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित विनम्र अभिवादन केले व सर्वाना शुभेच्छा दिल्या.

दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा भाग म्हणून महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड व प्रा. अश्विनी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग समुद्र किनारा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यामध्ये एन. एस. एस. स्वयंसेवकांनी समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिक कचरा गोळा केला. नागरिकांना कचऱ्याकरिता डस्टबिनचा वापर करावा असे आवाहन केले. स्वच्छता ही सेवा या विषयावर मराठी हिंदी व इंग्लिश भाषेमध्ये निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे