वल्लभ विद्यामंदिर पाडळदा येथे विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण
जिल्हा प्रतिनिधी नंदूरबार
वल्लभ विद्यामंदिर पाडळदा येथे विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण
जिल्हा प्रतिनिधी नंदूरबार
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नंदूरबार: ( जि प्र): पाडळदा येथील वल्लभ विद्यामंदिर पाडळदा शाळेत विकसित भारत अभियानाअंतर्गत बिल्डथाॅन स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना भारत शासना मार्फत प्रमाणपत्र मार्गदर्शक शिक्षक पर्यवेक्षक गणेश पाटील यांचे हस्ते राणी राहद्या पावरा , किर्ती संजय चौधरी,प्रियंका जितेंद्र कोळी,भावना दिपक कोळी यांना प्रदान करुन गौरव करण्यात आला.तसेच पेन , वह्या
शालेय शैक्षणिक वस्तू बक्षीस स्वरुप देण्यात आले.
तसेच शासना मार्फत आयोजित स्वच्छोत्सव उपक्रमाअंतर्गत निबंधस्पर्धात मानसी कोळी,दिव्या कोळी,अनुष्का चौधरी, एकता चौधरी,निखील पवार,खुशी पाटील, गिता पावरा , कृतिका पाटील तसेच सर्व सहभागींना पेन ,वह्या बक्षीस स्वरुप देऊन कौतुक करण्यात आले.
रांगोळी स्पर्धेत विजेते व सर्व सहभागींनाही बक्षीस देऊन कौतूक केले.स्वच्छोत्सव चित्रकला स्पर्धेत प्रथम चेतना जाधव,दिव्या कोळी तर द्वितीय पुर्वी कोळी, एकता चौधरी , भाग्यश्री कोळी तसेच सर्व सहभागी स्फर्धकांना स्केचपेन बाॅक्स,पेन्सील अशा शालेय वस्तू रुपात बक्षीन देण्यात आल्या.त्याचप्रमाणे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित निबंध लेखन आणि चित्रकला स्पर्धा़मधील विजेते कुलदिप ईशी,मानसी कोळी,कृतिका पाटील,एकता चौधरी,प्रियंका कोळी,अनुष्का चौधरी,किर्ती चौधरी या विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.सर्व बक्षीसे पर्यवेक्षक
गणेश पाटील यांचे स्वखर्चातून देण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक अंबालाल चौधरी , पर्यवेक्षक गणेश पाटील, आदर्श प्राथमिकचे योगेश सोनार , शिक्षक महेंद्र पाटील, धर्मेंद्र कुवर , अरविंद पटेल,भरत पाटील,भूपेंद्र पाकळे, दिव्या पाटील , मनिषा दाभाडे,सविता ठाकरे, दामिनी शिंदे, अश्विनी पाटील, रोहीणी सुर्यवंशी,तुषार पाटील,अमृत चौधरी सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
याप्रसंगी पर्यवेक्षक गणेश पाटील यांनी ,’ विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात विविध स्पर्धा व उपक्रमात उत्स्फुर्त सहभाग घ्यावा आणि आपल्यातले कौशल्य विकसित करावे यासाठी हि बक्षीसे आहेत.बक्षीस प्रेरणा
देतात. प्रेरणेतून आपला व्यक्तिमत्वाचा विकास होतो.आणि प्रेरणेतूनच राष्ट्र निर्माण होते ‘ असे संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चतूर पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन मल्हारराव ठाकरे यांनी केले.सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारींनी सहकार्य केले.



