Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरनागपूरमराठवाडासाहित्यगंध

मतितार्थ

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 4 8 2 9 7

मतितार्थ

अखेर तुझ्या भूमिकेचा
हाच होता तर मतितार्थ
मीच तुला गृहीत धरणे
कदापीही नव्हते सार्थ..//

तुझे मन जिंकण्यास
प्रयत्नांची केली शर्थ
कळून चुकले एव्हाना
ठरलोय मीच असमर्थ..//

मोकळ्या संवादातले
हुकत गेले सर्व संदर्भ
ना जाणो का लावले
मला हवे तसेच अर्थ..//

कुणी स्वतः स्विकारणे
हा निर्णय खरा यथार्थ
मात्र स्वतःला कुणावर
लादण्यात नसे पुरूषार्थ..//

झाला जरी भ्रमनिरास
टळला जरूर अनर्थ
तुटलो तरी सावरायला
ठरेन माझा मी समर्थ..//

विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे