
0
6
6
7
2
0
हवापालट
रोज रोज तेच काम
मनावर वाढतो तान फार
करूया हवापालट आपण
मन शांतीचे उघडेल द्वार
जाऊया निसर्गात आपण
घेऊ मोकळी हवा छान
मिळे मेंदूला चालना मस्त
आनंदाची दवा स्वस्त
नव ऊर्जा प्राप्त होईल
चैतन्याचा सदा बहर
हर्षित होऊ सारे आपण
कार्य करू आपण तत्पर
मन शांती मिळेल मनाला
शुध्द हवा मिळेल प्राणाला
शांत झोप लागेल छान
प्रभू चरणी लावू ध्यान
आजारापासून राहण्या दूर
हवापालट चढेल सूर
ऊर्जित होऊ सारे आपण
आनंदाचे पाहू दर्पण
पुरुषोत्तम वि.ठोंबरे
बंधुनगर, नागपूर
=========
0
6
6
7
2
0



