अलिबागई-पेपरकोकणपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
अंधारल्या वाटा ….!
पांडुरंग एकनाथ घोलप ता.जुन्नर, जि.पुणे
0
4
8
2
9
4
अंधारल्या वाटा ….!
अंधारल्या वाटा जरी
घे मशाल तू हाती
उजळून टाक दिशा
कर प्रयत्नांच्या वाती…१
लाख संकटे उभी दाराशी
तू भीती बाळगू नको
लढवय्या असू दे बाणा
समरांगण सोडू नको…२
अपयशाने खचू नको तू
जिद्दीने कर सामना
मनी असू दे तुझ्या फक्त
सदा यशकिर्तीची कामना…३
मार्गावरती येतील तुझ्या
नेहमीच अनेक अडथळे
पाय रोवूनी उभा रहा
होतील बघ दूर ते सगळे…४
अंधारल्या वाटांनाही त्या
दाखवून दे तुझे सामर्थ्य
लाभेल यशोदीपास तुझ्या
बघ अमौलिक जीवनार्थ…५
पांडुरंग एकनाथ घोलप
ता.जुन्नर, जि.पुणे
=======
0
4
8
2
9
4



