Breaking
कविताक्रिडा व मनोरंजनखानदेशपरीक्षण लेखमहाराष्ट्रसाहित्यगंध

मराठीचे शिलेदार समूहाने मला माझ्या शब्दांतून आणि लेखणीतून पुन्हा माझ्याशीच जोडून दिलं; सीमादेवी बेडसे

लेखणी हातात नसल्यामुळे मन कुठेतरी सुनंसुनं वाटत होतं.

0 6 1 1 7 0

मराठीचे शिलेदार समूहाने मला माझ्या शब्दांतून आणि लेखणीतून पुन्हा माझ्याशीच जोडून दिलं; सीमादेवी बेडसे

लेखणी हातात नसल्यामुळे मन कुठेतरी सुनंसुनं वाटत होतं.

काल सकाळी आदरणीय दादांचा मेसेज आला, “तुमचा फोटो पाठवा.” मेसेज वाचून मनात एक वेगळाच आनंद उमलला. कारण काही दिवसांनी पुन्हा माझ्या शब्दांना सर्वोत्कृष्टची दाद मिळाली होती. मध्यंतरी पंधरा दिवस केरळ सहलीमुळे लेखणीला विराम दिला होता. पण खरं सांगायचं तर, या समूहाची आणि आपल्या या परिवाराची इतकी सवय झाली आहे की त्या दिवसांतही समूहाची, आपल्या सगळ्यांची आणि लिखाणाची खूप आठवण येत होती. लेखणी हातात नसल्यामुळे मन कुठेतरी सुनंसुनं वाटत होतं.

परत आल्यानंतर पुन्हा लेखणी हातात घेतली आणि आपल्या परिवारात रमले. माझ्या “गावाकडची श्रीमंती’, ‘महत्त्व समजू या’, ‘गुरु दीपस्तंभ’ या रचनांना सन्मानपत्र मिळालं आणि ‘धुंद फुल पाने’ या चित्र-चारोळीला सर्वोत्कृष्टचा सन्मान मिळाला.
आणि आज पुन्हा सकाळी दादांचा मेसेज आला, “तुमचा फोटो पाठवा.” समूहात पाहिलं तर माझ्या ‘सारवासारव’ या चारोळीला देखील सर्वोत्कृष्टचा सन्मान मिळालेला होता.

खरं तर मला स्वतःचे फोटो काढण्याची फारशी आवड नाही. पण आता वाटतं, तोच तोच फोटो का पाठवायचा? नवा फोटो काढूया…! ही छोटीशी गोष्टही माझ्यासाठी खूप मोठी आहे. कारण धकाधकीच्या जीवनात आपण अनेकदा सगळ्यांसाठी जगताना स्वतःवर प्रेम करायला विसरतो.या समूहाने मात्र मला माझ्या शब्दांतून आणि लेखणीतून पुन्हा माझ्याशीच जोडून दिलं.
माझ्यातली हरवलेली उमेद जागी केली आणि मला पुन्हा स्वतःवर प्रेम करायला शिकवलं. माझी ‘सारवासारव’ रचना लिहिताना मनातलं सत्य शब्दांत उतरवण्याचा प्रयत्न केला होता—

“चुकांची पानं मिटवताना
शब्दांची केली जुळवाजुळव,
खरं मात्र ओठांवर येईना,
सुरू झालं सारवासारव…”

आणि शेवटी सत्याच्या आरशासमोर उभं राहिल्यावर

“मनाला ठाऊक होतं सारे,
कितीही दिले खुलासे,
सत्याच्या आरशासमोर मात्र
हरवले सारे तमाशे…”

या भावनेला सर्वोत्कृष्टची दाद मिळणं म्हणजे माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर माझ्या मनाला मिळालेली एक हळुवार थाप आहे.आणि “‘धुंद फुल पाने”‘ मध्ये तर निसर्गाच्या ताजेपणासोबत माझं मनही पुन्हा ताजं झालं होत

“धुंद फुल पाने,दवबिंदूचा साज,
पहाटेने धरला निसर्गाचा बाज…”
“हळुवार वाऱ्याशी खेळताना सारे
मन झाले आज पुन्हा एकदा ताजे…”

कदाचित म्हणूनच या चारोळीचा सन्मान माझ्यासाठी आणखी खास आहे. निसर्ग ताजा झाला आणि त्याच्यासोबत माझं मनही! माझ्या शब्दांना मान दिल्याबद्दल,माझ्या लेखणीला प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि प्रत्येक वेळी माझा उत्साह वाढवल्याबद्दल आदरणीय राहुल दादा. आ.पल्लवीताईजी. सखी सवू ,चित्र चारोळी परिक्षक, तसेच समस्त प्रशासक परिक्षक मंडळींचे मनःपूर्वक धन्यवाद.

मला अभिनंदनीय शुभेच्छा देऊन प्रोत्साहित केल्याबद्दल समूहातील सर्व सहकारी बंधू भगिनींचे अंतःकरणपूर्वक खूप खूप आभार तुम्ही दिलेला हा सन्मान माझ्यासाठी फक्त पुरस्कार नाही. तो माझ्या शब्दांना मिळालेली दाद आहे, माझ्या भावनांना मिळालेली ओळख आहे, आणि माझ्या लेखणीला मिळालेली नवी उमेद आहे. असंच प्रेम, अशीच कौतुकाची थाप आणि असा हा आपुलकीचा परिवार कायम माझ्या सोबत राहू द्या. थांबते…मनापासून धन्यवाद. मनःपूर्वक आभार!

श्रीमती सीमादेवी बेडसेतालुका चाळीसगाव
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 1 1 7 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे