Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकियविदर्भ

कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे परभणीत आज राज्यस्तरीय शिक्षण परिषद

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

0 4 8 2 8 4

कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे परभणीत आज राज्यस्तरीय शिक्षण परिषद

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

राज्यभरातून कास्ट्राईबचे शेकडो शिलेदार राहणार उपस्थित

जिल्हा प्रतिनिधी, परभणी

परभणी: कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथे राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात परभणी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या शिक्षक, शिक्षिकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून परभणी नगरीचे विद्यमान आमदार राहुल पाटील उपस्थित राहणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून दंगलकार नितीन चंदनशिवे, सांगली हे उपस्थित राहणार आहेत.

राज्यस्तरीय शिक्षण परिषद व वार्षिक सर्वसाधारण सभेच्या या समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व मुख्याध्यापकांचा सत्कार सोहळा संपन्न होणार असून, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असल्याचे कास्ट्राइब शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बी डी धुरंधर व राज्य सरचिटणीस सतीश कांबळे यांनी सांगितले. या कार्यक्रमास राज्यातील सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्ह्याचे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष, सचिव व राज्यातील सर्व कास्ट्राईबचे कार्येकर्ते उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विदर्भातून मुख्य संघटन सचिव, परशराम गोंडाणे, डॉ. सुभाष गायकवाड, प्रमोद मुरार, जिल्हाध्यक्ष वर्धा, आकाश पाटील, जिल्हा सरचिटणीस वर्धा, राज्यप्रसिद्धी प्रमुख राहुल पाटील, संजय उके, जिल्हाध्यक्ष गोंदिया यांची उपस्थिती राहणार आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची नावे

1) शंकर उत्तमराव दांडगे उच्च श्रेणी मुख्याध्यापक जि प प्रा शाळा साखरतळा ता. जिंतूर
2) श्रीमती श्रीदेवी किशनराव वाणी प्रा. शि. जि प प्रशाला दुधगाव ता. जिंतूर
3) श्रीमती तमन्ना शोभा रामराव प्रा. शि. प्रा.शाळा कोल्हा ता मानवत
4) श्री योगेश ज्ञानोबा देशमुख प्रा. शि.
प्रा शाळा उक्कलगाव ता. मानवत
5) श्रीमती मनीषा बाळासाहेब घोंक्षे प्रा. शि. प्रा. शाळा बाबुलतार ता. पाथरी
6) श्रीमती सविता तुळशीराम भराडे प्रा. शि के. प्रा शा लिंबा ता. पाथरी
7) श्रीमती कमल कठाळू दवंडे
उच्च श्रेणी मुख्याध्यापिका
प्रा शा नांदखेडा ता परभणी
8) श्री सचिन प्रकाशराव सोनडवले प्रा. शि. प्रा शा खानापूर ता. परभणी
9) श्री देवराव बंकटराव कराळे प्रा. शि
न्यू प्रा शा सेलू ता सेलू
10) श्री राजेश उदेभान कान्हेकर प्रा. शि. प्रा शा हिस्सी ता सेलू
11) श्रीमती आम्रपाली अमरदीप कावळे प्रा शि. प्रा शा पारवा ता पालम
12) श्री भगवान श्रावण गायकवाड प्रा. शि. प्रा शा पेठ पिंपळगाव ता पालम
13) श्री राहुल काशिनाथ कांबळे प्रा. शि प्रा शा गोचा तालुका गंगाखेड
14) श्रीमती शैला मारोतराव अंधोरीकर प्रा. शि.
प्रा शा शिवाजीनगर गंगाखेड
15) श्री विश्वनाथ संतुकराव गायकवाड प्रा. शि.
छत्रपती शिवाजी विद्यालय वडगाव स्टेशन ता. सोनपेठ
16) वैजनाथ रूपसिंग राठोड प्रा. शि.
नूतन प्राथमिक शाळा पाथरी ता पाथरी
17) सुवर्णमाला महादू भुजबळ प्रा. शि.
प्रा शा आडगाव तालुका पूर्णा
18) राजू लिंबाजी अंभोरे प्रा. शि.
प्रा शा भिम नगर तालुका पूर्णा
19) जयद्रथ बाबुराव गडेराव प्रा. शि.
प्रा शा साळापुरी ता परभणी
20) नरेंद्र मनोहर कांबळे प्रा. शि
प्रा शा तरोडा ता. परभणी

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे