0
4
8
2
9
4
भावनांचा गाव झाला गुल
ओसरीतली पंगत चावडीतली गंमत
गप्पांचा फड आता नाही रंगत…१
मोठयांचा आदर नात्याची कदर
एकत्र कुटुंबाचा पडला विसर….२
आजीची झप्पी आजोबांच्या गोष्टी
नातवाच्या कानी आता नाही पडत…३
प्रेम आटलं नात तुटलं
मुलाच्या हातून बापाचं बोट सुटलं…४
माणसं शिकली संस्कार विसरली
वार्धक्याची काठी पारखी झाली…५
जो तो झाला नुस्ता फॉर्मल
उंच इमल्यात झाला माणुस गुल..६
माणुसकी विकून झाला फकीर
भावनांचा गाव झाला चूर…७
पैठणकर.के.आर.
जि.नाशिक
======
0
4
8
2
9
4



