डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे भारतात एकता व एकात्मता; चरणदास चारभे
कास्ट्राईब शिक्षक संघटना व बचत गटातर्फे भव्य भोजनदान
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे भारतात एकता व एकात्मता; चरणदास चारभे
कास्ट्राईब शिक्षक संघटना व बचत गटातर्फे भव्य भोजनदान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
वर्धा : (दि १५): डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्य कास्ट्राईब शिक्षक संघटना व संविधान बचत गट यांच्या सयुक्त विद्यमाने दिनांक 14 एप्रिल ला ठीक 7.30 वा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ भोजनदाना चा कार्यक्रम सम्पन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार तर उदघाटक शिक्षण विस्तार अधिकारी चरणदास चारभे साहेब होते. तर प्रमुख पाहुणे भाजपा चे जिल्हाध्यक्ष सुनिलभाऊ गफाट, प्रशांत बुरले, गुड्डूभाऊ कावळे, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक धाबर्डे, आशिष कुचेवार, प्रकाश वागदे, आनंदराव मेघे विद्यालयाचे प्राचार्य संजय भस्मे, सेवानिवृत्त न्यायाधीश ऍड डी जि कांबळे आदिची उपस्थिती होती.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून करण्यात आले. याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या संविधानामुळेच भारतात एकता, एकात्मता व बंधुभाव टिकून आहे असे मत उद्घाटकीय भाषणात शिक्षण विस्तार अधिकारी चरणदास चारभे यांनी आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन स्वाती नगराळे यांनी तर प्रास्ताविक श्रीकृष्ण भस्मे यांनी केले तर आभार नारायण मुन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगीराज पाटील, नितेश कालपांडे, आर पी थुल, ताराचंड भगत, प्रवीण लोहे, धर्मदास आढाऊ, पांडुरंग भरणे, रजनीश फुलझेले, शीतल हाडके, अंजु पाटील, स्वाती सवाई, स्वाती नगराळे, तक्षणा लोहकरे, अनिल वानखेडे, दीप नाखले, गोपाळ मुन, नागसेन तेलन्ग, राजू थुल प्रफुल बनसोड, श्रीकृष्ण भस्मे,प्रवीण हुमणे,सुरेश सोनटके, प्रवीण तेलन्ग, देवांनंद टाकसाडे विशाल गावंडे सूरज गणवीर, अनिल नगराले, मीनाक्षी गणवीर, विलास भगत धोबे, कैलास हाडके चंद्रशेखर वैद्य, वर्षा नगराळे, मंगला पाटील, नितीन कांबळे दिपचंड जुमडेनागसेन तेलन्ग, सुदेश खोब्रागडे अनिल नगराळे, विशाल गावंडे गोपाळ मुन श्याम लोखण्डे आदिनी परिश्रम घेतले.



