0
4
8
2
9
7
खेळ
खेळात त्या तुझ्यासवे, मला जिंकता न आले
मैदान सोडुनी पुढे, मला पळता न आले.
कितीदा प्रयत्न केला, हरविण्याचा तुला मी
शुरविरा सोबतच, मला लढता न आले.
कितीदा डाव टाकले, यशस्वी झालोच नाही
गनीमीकाव्यातुनी त्या, निसटता न आले.
नेत्र तिरकमलांनी, पुरता घायाळ झालो
पडलो थंडगार मी, काही बोलता न आले.
ठरवूनी टाकले मी, पुन्हा लढायचे नाही
जेव्हा तळ्यात बुडालो, मला पोहता न आले.
दिपककुमार सरदार
ता.लोणार जि.बुलढाणा
========
0
4
8
2
9
7



