विश्वविक्रमी ‘डहाळी’ अनियतकालिकाचा 1200 वा अंक प्रकाशित…!!
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

विश्वविक्रमी ‘डहाळी’ अनियतकालिकाचा 1200 वा अंक प्रकाशित…!!
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पुणे : 13 ऑक्टोबर 2026 डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित ‘ डहाळी ‘ अनियतकालिकाच्या विश्वविक्रमी 1200 व्या विशेषांकाचे प्रकाशन पियानोवादक मास्टर ऋग्वेद संजय भिडे याच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले. मेघना मधुसूदन घाणेकर आणि तन्मयी घाणेकर भिडे यांनी संयोजन केले.
सदर बालविशेषांकात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांची बालकविता आणि व्यंगचित्राचे खास आकर्षण आहे. डाॅ.मधुसूदन घाणेकर डहाळी अंक पूर्णपणे सुलेखनाच्या माध्यमातून तयार करतात. गेली 21 वर्ष सदर उपक्रम डाॅ.घाणेकर चालवतात. अंक विनामुल्य, विना वर्गणीदार आणि विना प्रायोजक असतो.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या संपादन क्षेत्रास नुकतीच 50 वर्ष उलटून गेली. इंटरनॅशनल व्ह्यू पुरस्कार तसेच मधुकर्णिका आंतरराष्ट्रीय माध्यम जीवनगौरव पुरस्कारांनी डाॅ.घाणेकर सन्मानित झाले आहेत. डहाळी अंकाच्या संपादन विषयक अनेक विश्वविक्रम डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या नावावर आहेत.आत्तापर्यंत सुमारे 9000 साहित्यिकांना डहाळी अंकाच्या व्यासपीठाचा लाभ झाला आहे. नवोदित, वंचित आणि दिव्यांग घटकांच्या साहित्याला डाॅ. घाणेकर प्राधान्य देत असतात. डहाळी अनितकालिक देशविदेशातील माध्यमांकडून विशेष गौरवले गेले आहे.



