जिल्ह्यातील सर्वात मोठा स्ट्रफ ग्राउंड उभारून अनिल काळमेघ यांनी नवा आदर्श निर्माण केला: खासदार श्यामकुमार बर्वे
रजत डेकाटे प्रतिनिधी

जिल्ह्यातील सर्वात मोठा स्ट्रफ ग्राउंड उभारून अनिल काळमेघ यांनी नवा आदर्श निर्माण केला: खासदार श्यामकुमार बर्वे
विकासाला विरोध करणाऱ्यांचे मनसुबे ध्वस्त – कुंदाताई राऊत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष
रजत डेकाटे प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर/ रामटेक: (दि २४ मार्च) येरला येथे जिल्ह्यातील सर्वात मोठे स्ट्रफ ग्राउंडचा लोकार्पण सोहळा मोठ्या हर्षोल्हासात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरा करण्यात आला.
येरला येथे गावातील खेळाडू युवकांच्या आग्रहास्तव येरला गावचे सरपंच अनिल काळमेघ आणि उपसरपंच राजेंद्रजी अखंड यांच्या अथक प्रयत्नातून जिल्ह्यातील सर्वात मोठे १० हजार चौरस जागेत स्ट्रफ ग्राउंड चे स्वप्न साकारण्यात आले. लोकसहभाग आणि ग्रामपंचायत प्रतिनिधी यांनी मनात आणले तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. हेच सरपंच अनिल काळमेघ आणि उपसरपंच राजेंद्रजी अखंड यांनी दाखवून दिले आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून रामटेक निर्वाचन क्षेत्राचे खासदार श्याम कुमार बर्वे, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कु. कुंदाताई राऊत, अश्विनजी बैस अध्यक्ष नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी, प्रीतीताई अखंड माजी सदस्या पंचायत समिती नागपूर अनुजाताई महाजन हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी राज्यस्तरावरील आणि राष्ट्रीय स्तरावरील काही खेळाडूंचा खासदार श्याम कुमार बर्वे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या स्ट्रफ ग्राउंड च्या विषयी माहिती देत असताना सरपंच अनिल काळमेघ भावनावश झालेत. त्यांनी सांगितले की गावातील तरुण पिढी ला सशक्त बनवायचे असेल तर अभ्यासासोबतच खेळाला सुद्धा तितकेच महत्त्व देणे आवश्यक आहे. परंतु त्यासाठी एका चांगल्या ग्राउंडची आवश्यकता होती. एका चांगल्या ग्राउंडची निर्मिती करत असताना माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले. अंधाऱ्या रात्रीतूनच नवा दिवस उगवतो त्याप्रमाणे या सर्व विपरीत परिस्थितीत माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सहयोगातूनच संघर्ष करीत एका साध्या ग्राउंड पासून जिल्ह्यातील सर्वात मोठे स्ट्रफ ग्राउंडची निर्मिती होऊ शकली.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये रामटेक लोकसभा निर्वतन क्षेत्राचे खासदार श्याम कुमार बर्वे यांनी आपले विचार व्यक्त करताना येरला ग्रामपंचायतचे सरपंच अनिल काळमेघ यांचे कौतुक केले. विपरीत परिस्थितीशी संघर्ष करीत ज्या प्रकारे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या स्ट्रफ ग्राउंड च्या निर्मितीमध्ये ज्या इच्छाशक्ती दाखविली त्याचे जितके अभिनंदन करावे तितके थोडेच असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की अनिल काळमेघ यांचे कार्य हे इतर ग्रामपंचायतींना प्रेरणा देणारे कार्य आहे. तसेच विकासासाठी राजकारण करीत आदर्श निर्माण केला असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष कु. कुंदाताई राऊत यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करीत असताना सरपंचांवर करण्यात आलेल्या खोट्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्या म्हणाल्या की, निव्वळ विरोधाला विरोध न करता गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या अनिल काळमेघ सारख्या सरपंचांच्या नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभे राहू. आणि विरोधाला विरोध करणारे भाजपाचे षडयंत्र हाणून पाडू. मात्र हे सारे करत असताना गावाचा सर्वांगीण विकास आणि नवे खेळाडू तयार करण्याचे कार्य नियमित चालू राहणे अत्यंत गरजेचे आहे. या स्ट्रफ ग्राउंड निर्मितीच्या वेळी विरोधकांनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सरपंचांना आपल्या पक्षात घेण्यासाठी जे कारस्थाने केलीत याविषयी त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. सोबतच योग्य वेळी त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. सोबतच अडचणी आणि अपयशांना न घाबरता सतत प्रयत्नशील विकासात्मक कार्य करीत खेळाडू आणि युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे त्यांनी अभिवचन दिले.
अंकुश भडांगे राष्ट्रीय खेळाडू फुटबॉल महेश गहेरवार राष्ट्रीय खेळाडू बास्केटबॉल मनीष रामटेके राष्ट्रीय खेळाडू क्रिकेट नितीन कानडे राष्ट्रीय खेळाडू हॉलीबॉल डॅनियल नॅथियल राष्ट्रीय खेळाडू सॉफ्ट बॉल यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला तसेच मैदान तयार करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले अशा सर्व युवक खेळाडूंचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी फेटरी बोकारा जिल्हा परिषद सर्कलमधील ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यासोबतच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री भगवानजी मिसाळ, शिवदासजी चेके, बबनजी राऊत, रुईकरजी शेवाळे, मनोहरजी काळमेघ, राजू दवंडे, बाबूलाल कावळे, इंद्रजीत हेलोंढे, मोरेश्वरजी भोयर, जयंता काळमेघ, राजू दवंडे, काळे, बादल डोके, अरविंद यादव, विजय बोंडे, सुनील दवंडे, आशिष जुनगरे, प्रज्वल बोडे, प्रणय मानकर, विनीत बोडे, कुणाल पेठे, हर्षल पेठे, प्रज्वल ढुमणे, संचित लोखंडे, मयूर टाले, राकेश नवघरे, विकी पुढे, अभिषेक करणाके, सौरव काकडे, राहुल बोडे, पियुश शेवाळे, प्रकाश तबाने, प्रेम वानखेडे, गणेश पटेल, भूषण बोकाडे, अजय भुकाडे, हर्ष कावळे, यांनी सहकार्य केले. तर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रमोद मिसाळ यांनी केले.



