Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितामुंबईसाहित्यगंध

अंतरीचा उजेड

संजय गरबड मराठे उल्हासनगर, जि.ठाणे

0 5 2 4 6 3

अंतरीचा उजेड

कधी प्रेम वाटे, कधी भक्ती व्हावी,
तुझ्या पाऊलांशी मिठी ही मिळावी.
नको शब्द ओठी, नको अर्थ काही,
तुझ्या दर्शनाविण दुजे न काही.

जसा चंद्र भासे नभी चांदण्याला,
तसा प्राण हा आसुसे भेटण्याला.
तुझे रूप डोळ्यांत साठवून घेऊ,
अशा प्रेमाच्या सागरा पोहून जाऊ.

समर्पून देही तुला साद घालू,
तुझ्याच स्वरांनी स्वताला निहाळू.
भले पंथ वेगळे, जरी मार्ग नाना,
मिळे भक्तीमध्ये सुखाचा ठिकाणा.

तुझ्या नामघोषात हरवून जावे,
तुझ्या चरणी या विश्व विसरून जावे.
नको राजवाडा, नको भोग काही,
तुझ्या सावलीतच विश्रांती राही.

तुझ्या तेजाने हा उजळो अंधार,
मिटावे मनातील सारे विकार.
जशी वात तेवते समयीच्या ठायी,
तशी भक्ती माझी उरो पायपायी.

मिळावा सदा अंतरी तुझा श्वास,
मनी दरवळू दे तुझाच सुवास.
तुझ्या प्रीतीचा हा अखंड सोहळा,
जणू लागला पंढरीचाच चाळा.

संजय गरबड मराठे
उल्हासनगर, जि.ठाणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 4 6 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे