Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

नगरसेविका स्वप्नालीताई पंडित यांच्या हस्ते ‘स्त्री: संघर्ष ते स्वराज्य २०२६’ वार्षिक अंकाचे स्वागत

वसुधा नाईक प्रतिनिधी पुणे

0 5 5 6 4 4

नगरसेविका स्वप्नालीताई पंडित यांच्या हस्ते ‘स्त्री: संघर्ष ते स्वराज्य २०२६’ वार्षिक अंकाचे स्वागत

_स्त्री शक्ती मंचाचा प्रेरणादायी उपक्रम_

वसुधा नाईक प्रतिनिधी पुणे

महिलांच्या विविध क्षेत्रातील योगदानाला व्यासपीठ देण्यासाठी ‘स्त्री शक्ती मंच’ तर्फे दरवर्षी प्रकाशित होणारा ‘स्त्री: संघर्ष ते स्वराज्य २०२६’ या वार्षिक अंकाचे स्वागत नगरसेविका स्वप्नाली ताई पंडित यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. छत्रपती संभाजीनगरातून सुरू झालेला हा साहित्यिक उपक्रम आज संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारला असून विविध क्षेत्रातील महिलांना एकत्र आणणारा समृद्ध परिवार म्हणून ओळखला जात आहे. स्त्री शक्ती मंचाचा हा सलग चौथा अंक असून मुख्य संपादक चंद्रकांत तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील विविध जिल्ह्यातील कार्यकारी संपादकांचे मोलाचे योगदान लाभले आहे. पुणे जिल्ह्याच्या वतीने शनिवार पेठ, काळा हौद येथील सबकुछ मधुसूदन, विश्वगुरू, २० देशात सहिवरून भविष्य कथन करणारे, सर्वाना आनंद देणारे साहित्यिक मा. मधुसूदन घाणेकर यांनी देखील या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या.
वार्षिकांक पुस्तकाचे संपादक चंद्रकांत तायडे (छत्रपती संभाजीनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वागत कार्यक्रम पार पडला. तसेच पुणे जिल्ह्याच्या कार्यकारी संपादक तथा प्रसिद्धी प्रमुख सौ. वसुधा वैभव नाईक यांचेही यात मोलाचे सहकार्य लाभले आहे. या अंकात शंभरहून अधिक साहित्यिकांचे लेखन प्रकाशित असून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा यात प्रमुख सहभाग आहे. तसेच स्त्रीची जिद्द, ताकद, संघर्ष या ऐतिहासिक विषयांचा यात समावेश आहे. यावेळी स्वप्नाली ताई यांनी संपूर्ण उपक्रमाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 5 6 4 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे