ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंध
दूरचे डोंगर
0
4
8
3
0
0
दूरचे डोंगर
ते दूरचे डोंगर सखे
बघ दिसते किती साजरे
तिथेच जाऊन येऊ आपण
माळीन तव केसात गजरे
हिरवी झाडी तांबूस माती
सन्यस्त होऊन बसे गिरी
समोर असेल नदी अवखळ
चल बसूया ओल्या तिरी
तिथेच कुठेतरी शांत स्थळी
बांधू आपण घर छोटेसे
अवती भवती रान पाचूचे
स्वप्न पाहूया जरा मोठेसे
किलबिलाट खगांचा
येईल मंजूळ नाद कानी
आपण राघू मैना दोघे
जोडीने गाऊ सोबत गाणी
काय न कळे पण सखे
सपान पाहतो किती मोठे
निसर्ग हा राजा इथला
त्यापुढे आपण खूप छोटे
सविता धमगाये,नागपूर
=========
0
4
8
3
0
0



