Breaking
कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

घाव हृदयातील; अस्मिता हत्तीअंबिरे

0 4 8 2 9 3

घाव हृदयातील

व्याकुळ जीव माझा
चारचौघात हसत रोज होता
मनातील आक्रोस जश्यास तसा
कुणास सांगताच येत नव्हता

वेदना जीवाच्या माझ्या
का नाही कळल्या तुला
की कळूनही दिल्यास तू
जखमा खोल आंतराला

घाव हृदयातील कधी
नाही दिसले तुला
डोळ्यातील अश्रु
रोज सांगे पापणीला

माझा तो श्वास फक्त
देहात टाक माझ्या
जो तुला मीअर्पण केला
निरागस जीव माझ्या

तूझ्या प्रेमात धन दौलत
नको होती रे मजला
जीव होता नादान जरा
जो फक्त तुझ्यात गुंतला

रक्तबंबाळ झाल्या वेदना
ठेचाळले पाऊल कितीदा
चालने नाही थांबले पण
घाव हृदयाला देतोस कितीदा

श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी
============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे